‘स्वास्थ भारत यात्रा’च्या यशस्वीतेसाठी योगदान द्या – गिरीश बापट

16 ते 27 ऑक्टोबर, 2018 देशात 'स्वास्थ्य भारत यात्रा' निघणाराय. महाराष्ट्रात ही यात्रा 18 ते 24 ऑक्टोबर असेल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ‘स्वास्थ भारत यात्रा’ची घोषणा केली. आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी मोदींनी केलेली ही घोषणा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केलंय.

‘इट राइट इंडिया’ चळवळ जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणनं (FSSAI) ‘स्वास्थ भारत यात्रा’ आयोजित केलीये. याबाबत माहिती देण्यासाठी मुंबईत बीकेसीतील एम. सी. ए. क्रिकेट क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट म्हणाले, “एफडीएने ऑनलाईन अन्न पदार्थ पुरवठा धारकांना अन्नपदार्थ पुरविणाऱ्या 113 आस्थापनांवर कारवाई केली. एकीकडे गरीब जनतेला एकवेळचे अन्न मिळण्यास अडचण येते. तर अन्न भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत भेसळ करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. ‘स्वास्थ्य भारत यात्रा’ ही जनतेला चांगल्या अन्नाबाबत जागृती करण्याचे साधन ठरणार आहे. या यात्रेत एफडीए,एनसीसी यासह सर्वच प्रशासन तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे. अन्नाबाबतची जागृती ही यात्रेपुरती मर्यादित न राहता निरंतर राहावी”

या यात्रेबाबत माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितलं की, “स्वास्थ भारत यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे, अन्न चाचणी, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमांचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. स्वास्थ भारत यात्रेची प्रत्यक्ष सुरुवात जागतिक अन्न दिनाच्या पूर्वसंध्येला दि.16 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यामध्ये सहभागी होणारे संपूर्ण प्रवास सायकल वरून करणार आहेत.”

कशी आहे स्वास्थ भारत यात्रा

 • 16 ते 27 ऑक्टोबर देशात यात्रेचं आयोजन
 • यात्रेतील सहभागी लोक सायकलनं प्रवास करणार
 • यात्रेसाठी संपूर्ण देशात एकूण 6 मार्ग बनवलेत
 • महाराष्ट्रातील 3 मार्गांचाही समावेश आहे
 • महाराष्ट्रात 18 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत यात्रा मार्गक्रमण करणार
 • प्रत्येक ट्रॅकवर साधारण 25 सायकलपटू असणार
 • सायकलपटू 50 ते 60 कि.मी. अंतर पूर्ण करून प्रत्येक टप्प्यात 2 ते 3 गावात आरोग्यविषयक जनजागृती करणार
 • सायकलपटू महाराष्ट्रातील 33 ठिकाणी भेटी देणार
 • मुंबई, पुणे, नागपूर येथे विशेष आरोग्य मेळाव्यांचे नियोजन
 • पुढील सायकल पथकाला रिले बॅटन सुपूर्द  करणार
 • २७ ऑक्टोबर रोजी पंतप्रानांच्या यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यात्रेची सांगता

‘इट राइट इंडिया’ हा या यात्रेचा  मुख्य उद्देश

‘आरोग्यदायी खा, सुरक्षित खा, पौष्टिक खा’ (इट हेल्दी, इट सेफ, इट फोर्टीफाईड) या त्रिसूत्रावर आधारित आहे.

इट हेल्दी – या संकल्पनेमध्ये ‘आज से थोडा कम’ म्हणजेच आहारातील साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी करणे, आरोग्यदायी अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करणे विशेष करुन अखंड कडधान्य, तृणधान्याचा वापर वाढवण्याबाबतच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव होतो.

इट सेफ –  या संकल्पनेमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेवर भर देणे, खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे, भेसळ रोखण्यासाठी सोप्या अन्न भेसळ ओळखणाऱ्या पद्धतींबाबत जनजागृती करणे आदींचा अंतर्भाव होतो.

इट फोर्टीफाईड – या संकल्पनेत ॲनिमिया मुक्त भारत हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये फोर्टिफाईड मीठाचा वापर वाढवणे, त्यास मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच विविध शासकीय योजना व कार्यक्रमांमध्ये फोर्टिफाईड अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter