चमचमीत पदार्थांमधील ‘या’ घातक घटकावर लवकरच मर्यादा

अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण आता अन्न सुरक्षा  आणि मानकं (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) नियमन, 2019 मध्ये बदल करणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून खाद्यपदार्थांमधील ट्रान्सफॅटवर 2 टक्क्यांपर्यंत मर्यादा घालण्यात येणार आहे, याबाबतचा मसुदा जारी करण्यात आला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वेफर्स, कुकीज, केक, बिस्किटं, मिठाई आणि इतर चमचमीत पदार्थ म्हटले की, त्यात ट्रान्सफॅट आलंच. हे ट्रान्सफॅट आरोग्यासाठी खूप धोकादायक असतं. त्यामुळे 2022 सालापर्यंत भारताला ट्रान्सफॅट मुक्त करण्याचं उद्दिष्ट अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं ठेवलं आहे. यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे, मात्र लवकरच तसा कायदा होणार आहे.

अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण आता अन्न सुरक्षा  आणि मानकं (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) नियमन, 2019 मध्ये बदल करणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून खाद्यपदार्थांमधील ट्रान्सफॅटवर 2 टक्क्यांपर्यंत मर्यादा घालण्यात येणार आहे, याबाबतचा मसुदा जारी करण्यात आला आहे.

या मसुद्यात नमूद केल्यानुसार, 1 जानेवारी 2022 पासून खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जाणारं तेल आणि फॅट्समधील फॅटी असिडच्या प्रमाणावर मर्यादा घालावी. खाद्यपदार्थात असलेलं एकूण तेल किंवा किंवा फॅट्स यांच्या वजनाच्या तुलनेत ट्रान्स फॅटी असिड 2 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं.

भारताला ट्रान्सफॅट फ्री करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं मोहीम राबवत आहे. खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी केली जाते आहे. आता तेल आणि फॅट्समधील ट्रान्सफॅटचं प्रमाण 5 टक्के ठेवण्यात आलं आहे,  2021 ला 3 टक्के तर 2022 पासून 2 टक्के होईल.

यासाठी अन्न व्यावसायिकांनीही आपल्या खाद्य उत्पादनांमधील ट्रान्सफॅट्सचं  प्रमाण कमी करावं, यासाठी प्रोत्साहित केलं जातं आहे. ट्रान्स फॅट फ्रीचा लोगो काढण्यात आला आहे आणि जे व्यावसायिक ट्रान्स फॅट फ्री तेल वापरतात आणि ज्यांचं औद्योगिक ट्रान्सफॅटचं प्रमाण 100 ग्रॅम खाद्यपदार्थामध्ये 0.2 टक्केपेक्षा जास्त नाही असे व्यावसायिक स्वेच्छेने आपल्या अशा उत्पादनांवर ट्रान्सफॅट फ्रीचा लोगो लावू शकतात.

म्हणजेच आतापर्यंत ट्रान्सफॅटचं प्रमाण कमी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्याची मुभा आहे. मात्र या नियमनामुळे ट्रान्सफॅट्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त नसणं, हे बंधनकारक होईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter