अर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी सरकार करणार उपाययोजना-दीपक सावंत

नाशिक जिल्हा रुग्णालयात ५ महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२, मे महिन्यात ३९, जून महिन्यात २५, जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्ट महिन्यात तब्बल ५५ बालकं दगावली. हे मृत्यू रोखण्यासाठी आता राज्य सरकारने उपाययोजना सुरू केलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या पाच महिन्यात १८७ अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, आता राज्य सरकारचे डोळे उघडलेत. रुग्णालयात बालकांचा मृत्यू कशामुळे झाला? या मृत्यूमागची कारणं काय? आणि यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.

राज्यातील ३६ नवजात शिशू विशेष दक्षता कक्षामध्ये ५० हजारांहून अधिक बालके दाखल होतात. त्यांचा मृत्यूदर हा सहा ते सात टक्के असतो, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हंटलंय.

गेल्या पाच महिन्यात नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १,४९९ नवजात शिशुंपैकी १,३०२ बालकांना यशस्वी उपचारांमुळे जीवनदान मिळाल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय.

Child-Deaths-Nashik-insert-image

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, “ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या बालकांपैकी ५५ बालकांचा मृत्यू झाला. त्यातील ४७ बालके कमी वजनाची, कमी दिवसांची होती. फुफ्फुसांची पुरेशी वाढ देखील झालेली नव्हती. त्यांच्यावर उपचाराचासाठी पुरेसा अवधी देखील मिळाला नाही. ९० टक्के बालकं कमी वजनाची, एक ते दीड किलो वजनाची १२ तर एक हजार ग्रॅमहून कमी वजनाची १८ बालके होती. जंतूसंसर्ग होऊन ती बालकं आजारी पडतात. या रुग्णालयात दाखल झालेली ४७ टक्के बालकं इतर रुग्णालयातून आलेली होती. ती अतिजोखमीची असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.”

हे मृत्यू ॲक्युट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस, प्रि-मॅच्युरिटी बर्थ यामुळे झाले आहेत. यावर मात करण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही, आरोग्यमंत्र्यांनी दिलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयात ५ महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२, मे महिन्यात ३९, जून महिन्यात २५, जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्ट महिन्यात तब्बल ५५ बालकं दगावली.

ऑगस्टमध्ये दाखल झालेली ७१ बालकं दीड किलो वजनाच्या आतील होती. त्यातील ५७ बालकांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात ५०० ग्रॅम ते १००० ग्रॅम वजनाची, पुरेशी वाढ न झालेल्या ७० बालकांना विशेष उपचारामुळे नवजीवन मिळाले आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter