चांगली आणि शांत झोप हवी, मग ‘हे’ जरूर करा

किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र इतके तास आपण जी झोप घेत आहोत, त्याची गुणवत्ता कशी आहे याचा विचार आपण कधी केला आहे.

girl sleeping
प्रातिनिधिक प्रतिमा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दररोज 8 तासांची झोप घ्यावी, म्हणून आपण वेळेत झोपतो आणि वेळेत उठतो. मात्र तरीदेखील आपली झोप पूर्ण होत नाही, याचं कारण म्हणजे तुम्ही पुरेसा वेळ झोप घेत आहेत, मात्र गुणवत्तापूर्ण अशी पुरेशी झोप नाही.

म्हणजेच तुम्ही झोपेचा वेळ पाहता त्याची गुणवत्ता नाही. झोपेच्या वेळेसह त्याची गुणवत्ता वाढवणंही गरजेची आहे आणि अशी चांगली झोप हवी असेल, तर गरजेचं आहे दिवसभर शारीरिक कार्य करणं.

दिवसभर शारीरिक कार्य केल्यानं झोपेचा कालावधी तितकाच राहिला तरी झोपेची गुणवत्ता सुधारत असल्याचं एका अभ्यासत दिसून आलं आहे, यूएसमधील ब्रँडिज युनिव्हर्सिटी मानसशास्त्र विभागाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

संशोधकांनी ग्रेटर बोस्टॉनमधील ५९ लोकांचा अभ्यास केला. सरासरी 49 वयाच्या या व्यक्ती होत्या. त्यापैकी 72 टक्के महिला होत्या.

संशोधकांनी दिवसभर या व्यक्तींना जास्त चालण्यास किंवा शारीरिक कार्य करण्यास सांगितलं. या शारीरिक कार्याचं दररोज आणि महिन्याच्या शेवटी निरीक्षण करण्यात आलं. त्याची त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेशी तुलना करण्यात आली.

एका यंत्राच्या माध्यमातून या व्यक्तींच्या शारीरिक कार्याची नोंद ठेवण्यात आली. तर या व्यक्तींनी दरदिवशी आपल्या झोपेचा कालावधी आणि गुणवत्तेबाबत माहिती दिली. या दोन्ही गोष्टींची संशोधकांनी अभ्यासाच्या सुरुवातीला या व्यक्तींनी दिलेल्या माहितीशी तुलना करण्यात आली.

महिन्याच्या शेवटी चालणं वाढवल्यानं या व्यक्तींच्या झोपेचा कालावधी नाही, तर झोपेची गुणवत्तचा सुधारल्याचं दिसून आलं, विशेषत महिलांमध्ये हा परिणाम दिसून आला.

झोपेच्या वेळेपेक्षा झोपेच्या गुणवत्तेत शारीररिक कार्य खूप महत्त्वाचं असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे चांगली झोप लागावी, यासाठी दिवसभरात अशी सहजसोपी शारीरिक कार्यही पुरेशी आहे.

सोर्स – मेडिकल डेली

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here