केसातील कोंड्याने त्रस्त… मग ‘हे’ पदार्थ खा

अनेक शाम्पू, तेल वापरून केसातील कोंड्याची समस्या दूर होत नसेल, तर आहारात बदल करण्याची गरज आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केसातील कोंड्याने त्रस्त आहात. अनेक शाम्पू, तेल, क्रिम वापरले तरी केसातील कोंड्यापासून मुक्ती मिळत नाही तर मग तुमच्या आहारात बदल करा. कारण काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवलेली असू शकते. केसात कोंडा झाल्यानंतर कोणते पदार्थ खाणं फायदेशीर ठरू शकतात ते पाहुयात.

काबुली चणे

chickpeas-2388438_960_720

चण्यामध्ये व्हिटॅमिन बी-६ आणि झिंक असतं आणि जे केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही चण्याचं सेवन तर करायलाच हवं. शिवाय चण्याचं पीठ आणि दही एकत्र करून हे मिश्रण स्कॅल्पवर लावल्यासही केसातील कोंड्यापासून मुक्ती मिळेल.

सूर्यफुलाच्या बिया

sunflower-seeds-1478050_960_720

चण्याप्रमाणेच सूर्यफुलाच्या बियांमध्येही व्हिटॅमिन बी-६ आणि झिंक असतं. तसंच यामध्ये डोक्याची त्वचा म्हणजेच स्कॅल्पसाठी आवश्यक हेल्दी फॅटही असतं.

केळं

banana

रक्तदाब आणि मलावरोधापासून आराम देणारं केळं केसातील कोंड्यापासूनही आराम देतो. केळ्यात व्हिटॅमिन बी असतं. केळं कुस्करून फक्त डोक्याच्या त्वचेवर लावलं आणि काही मिनिटांनी धुतलं तरी तुम्हाला बराच फरक दिसून येईल.

लसूण

garlic-545223_960_720

लसूण आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, तशीच ती केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. लसणीमुळे फंगल इन्फेक्शन दूर करण्याची क्षमता आहे. लसूण ठेचून स्कॅल्पवर ठेवा आणि काही मिनिटांनी शाम्पूने धुवून टाका.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter