उन्हाळ्यात त्वचेला संरक्षण देतील ‘हे’ पदार्थ

उन्हाळ्यात त्वचेला फक्त वरून संरक्षण देणं पुरेसं नाही तर आतूनही संरक्षण देणं गरजेचं आहे. यासाठी त्वचेला संरक्षण देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रिन वापरतो, तसंच संपूर्ण शरीर झाकलं जाईल याची काळजी  घेतो. यामुळे तुमच्या त्वचेला सूर्याचे यूव्ही रेज म्हणजेच अतिनील किरणांपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. मात्र त्वचेला फक्त वरून संरक्षण देणं पुरेसं नाही तर आतूनही संरक्षण देणं गरजेचं आहे. यासाठी त्वचेला संरक्षण देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. या पदार्थांमुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचा स्वत: संरक्षण करते. त्यामुळे नियमित विशेषत उन्हाळ्यात या पदार्थांचं सेवन जरूर करावं. सूर्याच्या किरणांपासून त्वचेला संरक्षण देणारे हे पदार्थ कोणते आहेत ते पाहुयात.

कलिंगड

watermelon

उन्हाळा हा कलिंगडाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कलिंगडामध्येदेखील त्वचेच्या कॅन्सरशी लढणारा लिकोपिन घटक असतो. तसंच कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे तुम्ही नेहमी हायड्रेट राहता.

लाल द्राक्षं

सोर्स- स्टेप टू हेल्थ

द्राक्षातील क्युरेसेटिन या घटकात सूर्याच्या अतिनील किरणांपासून डीएनएला होणारी हानी कमी करण्याची क्षमता आहे. त्वचेच्या इन्फ्लेमेशनची समस्याही दूर होते. लाल द्राक्षांच्या सेवनानं डिहायड्रेशन समस्याही उद्भवत नाही.

स्ट्रॉबेरीज

STRAWBERRY

स्ट्रॉबेरीजमधील व्हिटॅमिन सी या अँटिऑक्सिडंटमध्ये त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रेडकल्सची तीव्रता कमी करण्याची क्षमता आहे. सनबर्नची समस्या दूर करण्यातही स्ट्रॉबेरीज फायदेशीर आहे.

टोमॅटो

tomato-1235662_960_720

टोमॅटोतील लिकोपिन हा घटन त्वचेच्या कॅन्सरपासून संरक्षण देतो. लिकोपिनमुळे त्वचेच्या कॅन्सरसाठी आणि वृद्ध दिसण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या फ्री रेडिकल्स कमी करतं.

गाजर

carrot

गाजरामधील बिटा केरोटिन सूर्याच्या अतिनील किरणांशी लढा देतं. बिटा केरोटिन या अँटिऑक्सिडंटमुळे त्वचेला संरक्षण मिळतं, सूर्याच्या अतिनील किरणांमुळे उद्भवणारी फ्री रेडिकल्सची समस्या दूर होते.

बदाम

फळांचं सेवन, निरोगी राहण्याचा मंत्रा!

मूठभर बदाम त्वचेला सूर्याच्या यूव्ही रेजपासून संरक्षण देतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते.

हिरव्या पालेभाज्या

Green_vegetables,_Blantyre,_Malawi

हिरव्या पालेभाज्यांमध्ये झिएक्सॅन्थिन आणि ल्युटिन हे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे त्वचेचं सूर्यापासून संरक्षण होतं. हे अँटिऑक्सिडंट सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारी पेशींच्या असामान्य वाढीला रोखतात हे प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात सिद्ध झालं आहे.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter