महाराष्ट्रातील 4 ठिकाणं होणार Clean street food hub

मुंबई, पुणे, नागपूर शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थांची एफडीएनं तपासणी केलीये. या शहरातील 4 ठिकाणांतील खाद्यपदार्थ खाण्यासाठी सुरक्षित आहेत. लवकरच या चारही ठिकाणांना क्लिन स्ट्रिट फूड हब म्हणून घोषित करून तसं फलक त्याठिकाणी लावलं जाईल.

0
770
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नकोस, त्यामुळे आजारी पडशील, असं आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. तरीही मोह आवरत नसल्यानं आपण ते पदार्थ खातो. मात्र आता लवकरच तुम्ही उघड्यावरील पदार्थ बिनधास्त खाऊ शकणार आहात. महाराष्ट्रातील 4 ठिकाणं लवकरच Clean street food hub म्हणून घोषित होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील ही ठिकाणं आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात उघड्यावर विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या. असे पदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यांच्यावर आळा बसावा म्हणून एफडीएनं एक विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेत रस्त्यावरील पदार्थांसह हॉटेल आणि रेस्टॉरंटचं ऑडिट केलं जातंय. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. या ठिकाणचे खाद्यपदार्थ खाण्यास योग्य असल्याचं आढळलंय. त्यामुळे लवकरच ही ठिकाणी क्लिन स्ट्रीट फूड हब म्हणून घोषित करण्यात येणारायत.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव म्हणाले की, ‘‘निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली. त्यानुसार अन्न निरीक्षकांनी मुंबईतील 15 तर पुण्यातील 10 आणि नागपूरमधील पाच हॉटेल्सचं सर्वेक्षण करून त्यांना रेटिंग दिलंय. या ठिकाणच्या खाऊगल्ल्यांचंही सर्वेक्षण करण्यात आलं. यात मुंबईतील गिरगार चौपाटी, जुहू चौपाटी, पुण्यातील सारसबाग आणि नागपूरमधील फुटाळा तलाव याठिकाणी तपासणी झाली. या विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली. या खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम असल्याचं आढळून आलं. त्यानुसार आता लवकरच या चारही ठिकाणांना क्लिन स्ट्रिट फूड हब म्हणून घोषित करणार. ग्राहकांच्या माहितीसाठी तसं फलक लावलं जाईल.”

आढाव पुढे म्हणाले की, ‘‘अन्न विभागातील अधिकाऱ्यांनी दोन-तीन वेळा जाऊन याठिकाणी सर्वेक्षण केलं. मुंबईतील 2 ठिकाणी 60 हून अधिक खाद्यपदार्थ विक्री स्टॉल आहेत. तर पुणे, नागपुरात 15 हून अधिक स्टॉल आहेत. या प्रत्येक स्टॉलवर जाऊन विक्रेत्याला सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. तसेच विक्रेत्यांना लागणारे पाणी, हँडग्लोव्हज आणि इतर साहित्यही आवश्यकतेनुसार पुुरवलं जाईल. या चारही ठिकाणांवर एफडीएच्या अन्न निरीक्षकांची नजर असणाराय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter