असे होतील ओठ सुंदर!

0
3854
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपण प्रत्येकजण पायाच्या नखापासून ते केसाच्या टोकापर्यंत काळजी घेतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नात असतो. परंतु ओठांवर आपल्या चेह-याचं सौंदर्य असतं यासाठी ओठांवरही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे ओठांचं सौंदर्य टिकवण्यासाठी काही टीप्स-

  1. ओठांसाठी अॅन्टी ऑक्सिडंट फार महत्त्वाचं असतं. ब्लूबेरीमध्ये ब्लूबेरी अॅन्टी-ऑक्सीडंट असतं. त्यामुळे ओठांच्या आरोग्यासाठी ब्लुबेरी युक्त लिपबाम वापरणे फायदेशीर ठरतं
  2. कॅनबेरीत व्हिटॉमिन बी ३, व्हिटॉमिन बी ५ आणि अॅन्टी-ऑक्सीडंट असतं. त्यामुळे जर ओठांची पर्यावरणामुळे किंवा उन्हामुळे हानी होत असेल तर ती हानी भरून निघण्यास मदत होते
  3. अनेकदा ओठांनर डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा जमा होते. ही मृत त्वचा नियमितणे काढावी. ओठांवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी सॉफ्ट ब्रशने ओठांवर मसाज करावा
  4. फाटलेल्या ओठांवर मृत त्वचा काढण्यासाठी खोबरेल तेलात साखर मिसळून हे मिश्रण ओठांवर लावा. त्याचा स्क्रब म्हणून वापर करा. त्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुऊन आणि त्यावर लिपबाम लावावा
  5. गुलाबजल आणि ग्लिसरीन हे दोन्ही ओठांच्या त्वचेसाठी फायदेशीर उपयुक्त असतं. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते
  6. संत्र्यात व्हिटॉमिन ए, सी, मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात अॅन्टी-ऑक्सीडंट असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत हानिकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे संत्रयुक्त लिपबाम लावल्याने ओठांना फायदा होतो
  7. ग्रीन टी ऑईलमध्ये अॅन्टी-ऑक्सीडंटचं प्रमाण असतं. हे ऑईल ओठांवर लावल्यास ओठ चमकदार दिसतात. शिवाय फाटलेल्या ओठांसाठी हे ऑईल खूप फायदेशीर आहे
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter