‘व्यायाम करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासारखंच’

डॉ. समीर दलवाई फीटनेसच्या बाबतीत फार काटेकोर आहेत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून ते फीटनेसला वेळ देतात. आज डॉक्टर फिटनेसच्या माध्यमातून आपण डॉ. समीर दलवाई यांच्या फीटनेसबाबत जाणून घेणार आहोत.

0
54
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

प्रत्येक व्यक्ती फीट राहण्यासाठी जमेल तसा वेळ काढतात. अनेकांना हे जमत नाही मात्र एखादा व्यक्ती ज्या व्यक्तीला ड्रम प्लेयर, अँकर, सालसा ट्रेनर तसंच संगीत आणि वाचनाची आवड आहे आणि तरीही तो फीटनेससाठी वेळ काढतो असं सांगितलं तर… थोडं आश्चर्य वाटेल पण, डॉक्टर समीर दलवाई इतक्या व्यस्त वेळपत्रकातून वेळ काढत फीटनेसला प्राधान्य देतात.

डॉ. दलवाई हे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या फीटनेसबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ती फीट राहू शकते. फीट राहण्यासाठी जीमला वैगरे जाणाऱ्यातला मी नाहीये. ते करण्यात मला आनंद मिळत नाही. मला डान्स आवडतो त्यामुळे मी फीट राहण्यासाठी सालसा करतो.”

याशिवाय डॉक्टर दलवाई त्यांचे प्रशिक्षक मानव फर्नांडिस यांच्यकडून ट्रेनिंग घेतात. आठवड्यातील दोन ते तीन दिवस ते मानव यांच्याकडून ट्रेनिंग घेतात. डॉ. दलवाई म्हणतात की, “मला मानल सोबत फीटनेस ट्रेनिंग घ्यायला फार आवडत कारण तो माझा चांगला मित्र पण आहे. याशिवाय खाण्यावरही माझा ताबा आहे. जेवढं शरीरासाठी गरजेचं आहे तेवढचं मी खातो. मला चॉकलेट खायला अजिबात आवडत नाही ते सोडून मी सर्व खातो.”

दलवाईंच्या सांगण्यानुसार, समतोल राखणं गरजेचं असतं. योग्य समतोल राखणं हा फीटनेसचा योग्य मार्ग आहे.

डॉ. दलवाईंचा दिवस सकाळी ७.३० वाजता सुरु होतो. प्रशिक्षक मानव यांच्यासोबत ट्रेनिंग करून ते सकाळचा नाश्ता करतात. यादरम्यान डॉ. दलवाई त्यांच्या आवडीची पुस्तकही वाचतात.

डॉ. दलवाई कधी-कधी त्यांच्या मित्रांच्या मुझिशियन ग्रुपला भेट देतात. डॉ. दलवाई पुढे म्हणतात की, “जेव्हा आम्हाला वेळ मिळतो त्यावेळी आम्ही भेटतो. या ग्रुपला भेटल्यावर मी त्यांच्यासोबत ड्रम वाजवतो. रात्री १.३० वाजता मी माझा दिवस संपवून झोपण्याच्या तयारीला लागतो.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter