पुणेकरांनो, हा चित्रपट महोत्सव तुम्ही नक्की पहा

पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी. पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पुणेकर या कार्यक्रमांना उत्फूर्तपणे दाद देतात. पुण्यात येत्या डिसेंबर महिन्यात आरोग्यविषयक चित्रपटांचा महोत्सव होणार आहे. यात लघूपटांच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पुणेकराने हा चित्रपट महोत्सव पाहायलाच हवा.

0
127
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

एखादी गोष्ट सांगून ती व्यक्तीच्या मनावर ठसवण्यापेक्षा दृष्य किंवा फोटोच्या माध्यमातून सांगितली तर जास्त चांगली लक्षात राहते. आरोग्यविषयक समस्या लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यातील एका सामाजिक संस्थेने अशीच शक्कल लढवली. या समाजिक संस्थेने आरोग्यविषयक समस्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचं ठरवलं आहे.

पुणेकर आपल्या आरोग्यावर खासकरून लक्ष देतात. त्यामुळे डिसेंबरच्या २२ आणि २३ तारखेला पुण्यात हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियात, दोन दिवसात ३० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. १९ लघूपट आणि ११ माहितीपट यात दाखवले जाणार आहेत. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, पश्चिमबंगाल एवढंच नाही तर इराण आणि बेल्जियम देशातूनही चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

या चित्रपटांचे आयोजनकर्ते चेतन गांधी म्हणतात, “मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या या जमान्यात सर्वकाही मोबाईलवर आहे. लोकं आजारांबाबत मोबाईलवर सर्च करून माहिती मिळवतात. पण, यापेक्षा काही असे आजार आहेत ज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.”

प्रसिद्ध नेत्रशैल्यचिकित्सक आणि पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंच्या हस्ते या आरोग्याविषयक चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे. यूएसके फाउंडेशनच्या विश्वस्त उशा काकडेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

चेतन गांधी पुढे म्हणतात, “लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हे एक चांगलं माध्यम आहे. आरोग्यविषयक चित्रपटांचा फिल्म फेस्टिव्हल आम्ही २०१०पासून सुरू केला.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter