फूड डिलीव्हरी बॉईजची होणार आरोग्य तपासणी

फूड डिलीव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करा, असे निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासान म्हणजेच एफडीएन सर्व ऑनलाईन फूड कंपन्यांना दिलेत.

0
104
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना ते आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमधूनच मागवतो, जेणेकरून आपल्याला चांगले आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळतील, याची खात्री असते. मात्र हेच फूड तुमच्या घरी घेऊन येणारा डिलीव्हरी बॉय त्याच्या आरोग्याचं काय?

तुमचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी तुम्हाला फूड डिलीव्हरी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयजचं आरोग्यही महत्त्वाचं आहे आणि यासाठी डिलीव्हरी बॉयजच् आरोग्य तपासणी करा, असे निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) सर्व ऑनलाईन फूड कंपन्यांना दिलेत. एफडीएनं सर्व फूड कंपन्यांना पत्र पाठवलं आहे.

यासंदर्भात ‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव म्हणाले की, ‘‘ऑनलाईन अन्न विक्री करणाऱ्या कंपन्या आणि फूड डिलिव्हरी बाईजची संख्या वाढते आहे. एखाद्या डिलीव्हरी बॉयला संसर्गजन्य आजार असल्यास त्याने अन्न हाताळणं योग्य नाही. त्यामुळे एफडीएने सर्व ऑनलाईन फूड कंपन्यांना पत्र पाठवलं आहे”

“ऑनलाईन फूड कंपन्यांना त्यांच्या अख्यारित कार्यरत सर्व डिलीव्हरी बाईजची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार आता सर्व कंपन्यांना या डिलीव्हरी बाईजची आरोग्य तपासणी करून एफडीएला याची माहिती देणं बंधनकारक आहे. जेणेकरून मुंबईसह राज्यभरात किती डिलीव्हरी बॉय काम करत आहे याची नोंदही एफडीएकडे राहिल.’’, असं आढाव यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)