पुणे: वडिलांनी दर्शवली आठ महिन्यांच्या मुलाचे अवयव दान करण्याची इच्छा

कमांडर के.पी यांनी आपल्या आठ महिन्याच्या मुलाच्या अवयवदानाची तयारी दर्शवलीये. यासाठी त्यांनी अवयवदानाचा फॉर्मही भरलाय. भारतात दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे अवयवदान करता येत नाहीत. पण, अवयवदान केल्याने लाखो रुग्णांचे प्राण वाचू शकतील ही जनजागृती करण्यासाठी कमांडर के.पी आणि त्यांच्या पत्नीने हा निर्णय घेतलाय. त्यांचा मुलगा एकदम फीट आहे. पण, पुढे मुलालाही काही झालं तर अवयवदान दान करावेत अशी त्यांची इच्छा आहे.

0
118
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तुम्हा सर्वांना मुंबईची आराध्या तर माहितच असेल. चार वर्षांची ही चिमुरडी तब्बल दीड वर्ष हृदयाच्या प्रतिक्षेत होती. अखेर, आराध्याला हृदय मिळालं. पण, देशभरात अशा अनेक आराध्या आहेत, ज्या योग्य वेळी अवयव न मिळाल्याने खितपत पडल्यात.

लहान मुलाचं अवयवदान ही भारतात खूप मोठी समस्या आहे. ही समस्या ओळखून, पुण्यातील कमांडर आदित्य के.पी. आणि त्यांच्या पत्नीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचं अवयव दान करण्याची इच्छा दर्शवलीये. देशात अवयवांच्या प्रतिक्षेत असलेल्यांची संख्या लाखात आहे, अवयव मिळाल्यास एखाद्याचे प्राण वाचू शकतात, या विचाराने कमांडर के.पी यांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याची इच्छा दर्शवलीय.

कमांडक के.पी यांच्या आठ महिन्यांच्या मुलाचं नाव आहे मयूर. माय मेडिकल मंत्राशी बोलताना कमांडर के.पी म्हणतात, “सुदैवाने माझा मुलगा फीट आहे. त्याला कधीच काही होऊ नये ही माझी इच्छा आहे. पण, जर पुढे त्याला काही झालं तर त्याचे अवयव वाया जाऊ नयेत. मयूरने जर कोणाला जीवनदान दिलं तर आम्हाला खूप आनंद होईल.”

कमांडर के.पी. यांनी स्वत: देखील नेत्रदानासाठी फॉर्म भरलाय. कमांडर के.पी पुढे म्हणतात, “माझा मुलगा मोठा झाला की, त्याला या सर्व गोष्टी कळतील. आणि त्याला याचा गर्व वाटेल.”

87d1b262-d5e2-4868-98c6-10005e70144b

कमांडर के.पी म्हणतात, “मी अनेकवेळा रक्तदान केलंय. अवयवदानामुळे केल्यामुळे तुम्ही कोणाचातरी जीव वाचवू शकता. भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. अवयवदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण होतेय. पण, अजूनही अवयवांची प्रतिक्षायादी खूप मोठी आहे. अनेक मुलांना अवयवांची गरज आहे. त्यामुळे माझं सर्व पालकांना आवाहन आहे की त्यांनी पुढे येऊन अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा.”

भारतात, दोन वर्षाखालील बाळांचं अवयवदान करण्याची परवानगी नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या एका डॉक्टर दांपत्याने आपल्या काही महिन्यांच्या बाळाचे अवयवदान करण्याची इच्छा दर्शवली होती. या, कुटुंबाने पंतप्रधान मोदींनी लहान मुलांच्या अवयवदानाबाबत एक पॉलिसी तयार करा अशी मागणी केली होती.

पुण्यातील रिबर्थ संघटनेच्या सदस्यांनी कमांडर के.पी यांना अवयवदानासाठी फॉर्म भरण्यास मदत केली. रिबर्थचे अध्यक्ष राजेश शेट्टी म्हणतात, “आम्ही याआधी अनेकांना अवयवदान करण्याबाबत मदत केलीये. पण, पहिल्यांदाच एक वडील मुलाचे अवयवदान करण्याची इच्छा घेऊन आमच्याकडे आलेत. हा मुलगा फक्त आठ महिन्यांचा आहे. या कुटुंबाने अवयवदानाच्या मोहिमेबाबत समाजामध्ये एक मोठा आदर्श घालून दिलाय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter