‘या’ कारणांनी वृद्ध व्यक्ती तोल जाऊन पडतात

वयस्कर व्यक्तींमध्ये तोल जाऊन पडण्याच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात उद्भवतात. यासंदर्भात भारतीय व्यक्तींचा अभ्यास केला असता, ६० वर्ष आणि त्यावरील व्यक्तींमध्ये तोल जाऊन पडण्याची प्रकरणं ही १४ टक्के ते ५२ टक्के दिसून आली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

जसं वय वाढतं तसा आजार बळावण्याचा धोका देखील वाढतो. वयस्कर व्यक्तींना दुखापत, आजार याचं प्रमाणही अधिक पहायला मिळतंय. याशिवाय आणखी एक समस्या ती म्हणजे तोल जाणं. रस्त्यावरून चालताना वयस्कर व्यक्ती अनेकदा तोल जाऊन पडतात त्यामुळे त्यांना दुखापत होते.

यासंदर्भात भारतीय व्यक्तींचा अभ्यास केला असता, ६० वर्ष आणि त्यावरील व्यक्तींमध्ये तोल जाऊन पडण्याची प्रकरणं ही १४ टक्के ते ५२ टक्के दिसून आली. पडल्यानंतर २१ टक्के लोकांना फ्रॅक्टर झाल्याचं दिसून आलं तर ८० टक्के लोकांना दुखापत झाली. पडल्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये हिप फ्रॅक्चरपाठीच्या कण्याची दुखापत तसंच डोक्याला मार लागणं या समस्या उद्भवतात.

डॉ. श्रीनिवास ठाकूर
डॉ. श्रीनिवास ठाकूर

वयस्कर व्यक्ती तोल जाऊन पडण्यामागे औषधोपचार हे सामान्य कारण असू शकतं. दिवसाला ५ किंवा त्यापेक्षा जास्त औषधं घेतल्याने या व्यक्तींमध्ये पडण्याचा धोका वाढतो. सारखा तोल जाणं, पडणं हे इतरही आजारांचे संकेतही असू शकतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या दररोजच्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

या कारणांमुळे पडण्याचा धोका वाढतो

 • वय झाल्याने
 • आर्थरायटीस
 • मधुमेहथायरॉईडची समस्याअनिमिया
 • स्ट्रोक किंवा पार्किन्सन डिसीज
 • बॅलन्स डिसॉर्डर
 • स्नायू कमकुवक होणं
 • डिप्रेशन किंवा मानसिक समस्या
 • डिमेंशिया
 • डोळ्यासंबंधी समस्या
 • औषधोपचार

पडण्याची नैसर्गिक कारणं

 • चालण्याची जागा घसरणारी असल्यास
 • योग्य त्या चपलांचा वापर न केल्याने
 • रस्त्यावर योग्य प्रमाणात प्रकाश नसल्यास

वयस्कर व्यक्तींनी एखाद्या वेळी पडल्यानंतर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने झालेल्या दुखापतीवर वेळीच उपचार करणं शक्य होतं. असा व्यक्तींना बॅलन्स ट्रेनिंगऔषधोपचारस्नायूंसाठी व्यायाम या पद्धतींचा अवलंब करण्यास सांगतात.

जेष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी

 • वयस्कर व्यक्तींशी सातत्याने त्यांच्या आरोग्याची चर्चा करावी
 • त्यांना नियमितपणे डोळ्यांची तपासणी करण्यास न्यावं
 • योग्य तो आहार द्यावा
 • चालताना या व्यक्तींच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter