अतिव्यायाम एक व्यसन..

एखाद्या दिवशी जास्त खाल्ल, गोड-धोड खाल्ल, व्यायाम झाला नाही की दुसऱ्या दिवशी जास्त व्यायाम आपण करतो. कोणी चिडवलं, जाड दिसतोयस असं म्हटल्यावर शरीरावर दुप्पट व्यायामाचा भार पडतो. निरोगी राहण्यासाठी व्यायाम चांगला पण, कोणत्याही गोष्टीचं व्यसन चांगलं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे दारू, ड्रग्ज याप्रमाणे व्यायामाचंही व्यसन लागतं.

0
166
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दारू, ड्रग्ज, सिगारेट, मोबाईल गेमिंग या व्यसनांबाबत आपल्याला माहितच आहे. व्यसन म्हणजे आरोग्यासाठी घातकच, प्रसंगी जीवघेणं. प्रत्येक जणं आरोग्याला जपतो. व्यसन करणाऱ्यांना अरे हे चांगलं नाही..सोड आता..असा सल्लाही देतो. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतो.

पण, तुम्हाला माहितेय..निरोगी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यायामाचंही व्यसन लागतं. बसला ना धक्का..होय निरोगी राहणं, हॅंडसम दिसण्यासाठी सतत व्यायाम करण्याचंही व्यसन लागू शकतं.

व्यसन म्हणजे काय?

व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं. मानसिक आणि शारीरीक बदल यामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती पाहिजे म्हणून आपण सारखं तेच करतो. यावेळी आपल्या मनावर आपला ताबा रहात नाही. याला व्यसन म्हणतात.

डॉ. तनय मैती
डॉ. तनय मैती

एक्सरसाईजच्या व्यसनाची सुरुवात

एक्सरसाईज प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्त्वाचा असतो. मात्र आजकाल कामाचा ताण-तणाव, व्यस्त वेळापत्रक यामुळे लोकांना एक्सरसाईज करण्यास वेळ मिळत नाही. तर दुसरीकडे काही लोकांचं एक्सरसाईज हेचं जीवन बनून जातं. काही वर्षांपूर्वीचा स्लिम द बेटर हा ट्रेंड पुन्हा सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. जीमस्लिमिंग सेंटरवजन कमी करण्यासाठीची हर्बल औषध यांमुळे ही समस्या अधिक वाढताना दिसते.

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन सायकॉलॉजजिकल असोसिएशन या दोन्ही संघटनांकडून एक्सरसाईज हे व्यसन असल्याचं सांगण्यात आलंय.

काही लोकं छान दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी अति-व्यायाम करतात. थोडं जरी जास्त खाल्ल तर वजन वाढेल या भीतीने दुसऱ्या दिवशी शरीरावर जास्त जोर देतात. जराजरी मित्र-मैत्रीणींनी चिडवलं ए जाड दिसतोयस, तर व्यायामाच्या मागे लागतात. पण, हे करताना आपण शरीरावर किती अतिरिक्त ताण टाकतोय हे विसरतात.

अति-व्यायामाचे शारीरिक धोके

दररोजच्या कामानंतर अति प्रमाणात एक्सरसाइज केल्याने क्रॅम्प येणेकाही ठिकाणी दुखापत होणे असा समस्या उद्भवू शकतात. अनेकवेळा परिस्थिती गंभीर होऊन एखादी कायमची दुखापत किंवा व्यंगत्वही येऊ शकतं. गरोदरपणात वजन वाढणं ही चिंता महिलांना असतेच. अशावेळी एक्सरसाईज करणं हे आई आणि बाळ दोघांसाठी उपयुक्त असतं. मात्र योग्य प्रमाणात एक्सरसाईज करणं गरजेचं असत. अति एक्ससाईज केल्यास हार्मोन्सवर परिणाम होतो शिवाय महिलेच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

एक्सरसाईज व्यसन कसं ओळखाल?

  • एक्सरसाईज एकटे असताना करणं
  • जीममध्ये असताना सेल्फी काढून अपलोड करणं
  • एखादी दुखापत झाली असतानाही एक्सरसाईज करणं
  • आरोग्यासाठी उपयुक्त आहार घेणं

मॅरेथॉनमध्ये धावण्याचा देखील संबंध एक्सरसाईज व्यसनाशी असल्याचं आढळून आलंय.

यावर उपाय काय कराल?

अशी समस्या आढळल्यास डॉकटरांकडून समुपदेशन किंवा थेरेपीद्वारे उपचार करून घ्यावेत. शारीरिक आणि मानसिक आजार वेळीच समजून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून एखाद्या आजाराचं निदान करून परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर त्यावर उपचार करता येईल.  

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter