व्यायाम आणि योग्य आहाराने ‘टाईप-२’ डायबिटीसवर मात शक्य

मधुमेह ही संपूर्ण भारताची समस्या झालीये. टाईप २ मधुमेही रूग्णांनी योग्य तो आहार, शारीरिक हालचाल आणि तपासणी नियमितपणे करणं गरजेचं आहे. यासाठीच पुण्यातील 'फ्रीडम फ्रॉम डायबेटीस' या फाऊंडेशनमार्फत जनजागृती करण्यात येतेय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
 • टाईप २ मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया योग्यरित्या होत नाही
 • टाईप २ मधुमेही रूग्णांनी योग्य तो आहार, शारीरिक हालचाल आणि रक्तातील साखरेची तपासणी नियमितपणे करणं गरजेचं
 • डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधंही वेळेवर घेतली पाहिजेत
 • पुण्यातील ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस’ या फाऊंडेशनमार्फत जनजागृती करण्यात येतेय
 • हे फाऊंडेशन २०११ सालपासून मधुमेही रूग्णांसाठी कार्यरत.
 • आतापर्यंत जवळपास ५ हजारांहून जास्त व्यक्तींना औषधांपासून तर १००० व्यक्तींना इन्सुलिनपासून मुक्त करण्यात यश आलं
 • यंदाच्या वर्षी त्यांचं १ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दीष्ट आहे

माय मेडिकल मंत्राशी बोलताना, फ्रीडम फ्रॉम डायबेटीसचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी सांगतात की, “या उपक्रमाद्वारे आम्ही अनेकांना वजन कमी करण्यास, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब या समस्यांपासून दूर होण्यास मदत केली. फीटनेसच्या अभावामुळे दरवर्षी मधुमेहाचे नवीन रूग्ण पाहायला मिळतात.”

डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले की, शरीरातील अतिरीक्त फॅटमुळे इन्सुलिनच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, शरीरात पित्त असेल तर रोगप्रतिकारक शक्ती योग्य काम करत नाही. या कारणांमुळे प्रौढ व्यक्तींमध्ये टाईप २ मधुमेहाचं प्रमाण अधिक आहे.

डॉ. त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार,

 • इन्सुलिनच्या पातळीची तपासणी करावी
 • कमरेचा घेर उंचीच्या मानाने अर्धा असावा
 • सी रिअॅक्टीव्ह प्रोटीनची (सीआरपी) तापसणी करावी. जेणेकरून शरीरातील पित्ताची पातळी लक्षात येईल
 • प्रत्येक व्यक्तीने अर्ध्या लिटरपेक्षा कमी तेलाचं सेवन करावं

हा उपक्रम राज्यातील विविध शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यात येतोय. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनीwww.freedomfromdiabetes.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)