सतत टीव्हीसमोर बसता? मग पायामध्ये गाठी होण्याचा धोका

टीव्हीसमोर अधिक काळ बसून राहिल्याने शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात बळावतो. संशोधकांच्या सांगण्यानुसार, दीर्घ काळ बसून टीव्ही पाहिल्याने रक्तवाहिन्यांना इजा पोहोचते. यामुळे पाय, हात किंवा फुफ्फुस यांच्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपण टीव्ही समोर बसल्यावर अनेकवेळा तासनतास एकाच पद्धतीत बसून राहतो. मात्र आता सावधान…तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, टीव्हीसमोर अधिक काळ बसून राहिल्याने शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात बळावतो.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, दीर्घ काळ बसून टीव्ही पाहिल्याने रक्तवाहिन्यांना इजा पोहोचते. यामुळे पाय, हात किंवा फुफ्फुस यांच्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होतात. ही समस्या सामान्यपणे ६० वर्ष आणि त्यापुढील व्यक्तींमध्ये दिसून येते.

यासाठी बर्लिंगट येथील वर्मंट विद्यापीठातील संशोधकांनी १५,१५८ व्यक्तींवर अभ्यास केला. यामध्ये ४५-६४ वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला.

या संशोधनाच्या माध्यमातून असं लक्षात आलं की, ज्या व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहोचली होती त्या व्यक्ती दीर्घकाळ टीव्हीसमोर बसत होत्या.

वर्मंट विद्यापीठातील प्राध्यापक मेरी यांच्या सांगण्यानुसार, “टीव्ही पाहणं यामध्ये काही वाईट नाही. मात्र स्नॅक्स घेऊन टीव्हीसमोर दीर्घकाळ बसणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.”

या संशोधनाच्या निकालात असं समजलं की, ज्या व्यक्ती अतिप्रमाणात टीव्ही पाहत होत्या त्यांच्या १.७ पटीने रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो.

या आधी केलेल्या संशोधनानुसार असं समजलं होतं की, दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, दीर्घकाळ टीव्ही पाहणं टाळल्याने रक्तवाहिन्यांना इजा पोहोचण्याचा धोका कमी होते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हा अभ्यास कॅलिफोर्नियाच्या अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय.

सोर्स- मेडिकल न्यूज टुडे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)