कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेमार्फत ‘मेधा’चं आयोजन

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेनं (COEP) २० जुलैला मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन (MEDHA-मेधा) आयोजित केलं आहे.

0
333
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेनं (COEP) २० जुलैला मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन (MEDHA-मेधा) आयोजित केलं आहे. वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांना ज्या वैद्यकीय उपकरणांची गरज भासते, अशी वैद्यकीय उपकरणं या हॅकॅथॉनमध्ये इंजिनीअर्समार्फत तयार केले जाणार आहेत.

सध्या भारतात वैद्यकीय उपकरणं आयात केली जातात. बहुतेक वैद्यकीय उपकरणं महागडी असतातत ज्यामुळे आरोग्य सेवांचा खर्चदेखील वाढततो. तसंच भारतातील डॉक्टरांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं आणि या समस्यांवर स्वदेशी उपाय हवेत, याच उद्देशातून कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेनं MEDHAचं आयोजन केलं आहे. पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी (NCL) मध्ये या हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या हॅकॅथॉनचं हे तिसरं वर्ष असून २ दिवसांचा हा हॅकॅथॉन असेल.

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेच्या प्रोडक्शन आणि इंजिनीअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप अनासाने यांनी सांगितलं, “आपल्याला आरोग्य क्षेत्रात ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे, त्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशानं या हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या २ वर्षांपासून या हॅकॅथॉनमार्फत बनवण्यात आलेल्या काही वैद्यकीय उपकरणांना पेटंट मिळालं आहे. काही उपकरणांची लवकरच निर्मिती करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत”

COEPच्या बायोमेडिकल इंजिनीआरिंग अँड टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटर्सअंतर्गत या हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सेंटर्समार्फत सल्लागार दिले जाणार आहेत आणि वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्यदेखील पुरवलं जाणार आहे.

बी. जे. मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रमेश भोसले म्हणाले, “प्रॅक्टिस करत असताना अनेकदा आम्हाला वैद्यकीय उपकरणांची गरज भासली. डॉक्टरांची ही समस्या स्वदेशी वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीतून सोडवली जाऊ शकते. मला कोणत्या वैद्यकीय उपकरणांची गरज भासली हे मी स्वतछ सांगितलं आहे आणि याबाबत काही टीमना मार्गदर्शनदेखील करणार आहे”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter