इमानचे मुंबईतील ते ८२ दिवस…

भारतात ८२ दिवस उपचार घेतल्यानंतर एकेकाळी जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणारी इमान अबूधाबीला रवाना झाली. मुंबईतील सैफी रुग्णालयात इमानवर उपचार करण्यात आले. डॉ. मुफज्जल लाकडावाला यांच्या टीमने इमानवर मुंबईत उपचार केले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

११ फेब्रुवारीला, इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद मुंबईत पोहोचली. इमानचं वजन, तब्बल ५०० किलो होतं. इमानला मुंबईत आणण्यासाठी विमानात एक खास बेड बनवण्यात आला होता.

Eman-Ahmed-in-aircraft-1024x576

इमान मुंबईत तर पोहोचली. पण, तिच्या वजनामुळे तिला सैफी रुग्णालयात नेणं शक्य नव्हतं. यासाठी तिचा बेड एका क्रेनच्या माध्यमातून उचलण्यात आलं. आणि इमानला पहिल्या मजल्यावरील तिच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या रुममध्ये ठेवण्यात आलं.

Crane

इमानला तिच्यासाठी खास बनवलेल्या रूममध्ये ठेवण्यात आलं. सैफी रूग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी यांनी इमानवर उपचार करण्यास सुरुवात केली.

Eman-in-Saifee-Hospital-1-e1487001017413-701x463वजन कमी करण्यासाठी इमानवर ७ मार्च २०१७ला यशस्वी बेरिअट्रीक सर्जरी करण्यात आली. सैफी रुग्णालयाचे बेरिअट्रीक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला आणि त्यांच्या टीमने इमानवर शस्त्रक्रिया केली.

Eman-Ahmed-701x462

शस्त्रक्रियेनंतर इमान डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली होती. इमानला हाय प्रोटीन डाएट (आहार) देण्यात येत होतं.

Eman-with-Dr-Aparna-Govil-Bhaskar-e1488991643442-300x178

मुंबईतील डॉक्टरांच्या उपचारांमुळे इमानचं वजन १७० किलोपर्यंत कमी झालं. इमान भारतात आली तेव्हा तिचं वजन तब्बल ५०० किलो होतं. भारतातून जाताना सैफीच्या डॉक्टरांनी २८ पानांचा डिस्चार्ज रिपोर्ट बुर्जीलच्या डॉक्टरांना दिला होता. ज्यात अजून एक बेरियाट्रीक सर्जरी धोक्याची असल्याची माहिती देण्यात आली होती.

Eman-photo-2-768x1024

इमानचं वजन कमी झाल्यानंतर तिला सैफी रुग्णालयातील ७०१ क्रमांकाच्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. ६ नर्सची टीम तिची देखरेख करत होती. रुग्णालयातील नर्सच्या म्हणण्याप्रमाणे, इमानला अबूधाबीला जायचं नव्हतं. पण, बहिणीने अबूधाबीला जाण्याचा निर्णय घेतला.

Eman-and-Saifee-staff-701x420

इमानची बहिण शायमाने सोशल मिडीयावर इमानचा एक व्हिडीयो अपलोड करून सैफीच्या डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तर डॉ. लाकडावाला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. शायमाचे सर्व आरोप डॉ. लाकडावाला आणि त्यांच्या टीमने फेटाळून लावले.

Screenshot_20170119-225123-e1486728186919-701x452

शायमाच्या आरोपांनंतर २७ एप्रिलला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डॉ. मुफज्जल लाकडावाला यांच्याशी चर्चा केली. तर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सैफीमध्ये जाऊन इमानच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

Dr-Deepak-Sawant-with-Eman-701x402

शायमाच्या आरोपांनंतर अबूधाबीच्या बुर्जील रुग्णालयाने इमानवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. बुर्जीलच्या डॉक्टरांची टीम मुंबईत आली. त्यांनी इमानची प्रकृती पाहिली आणि मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा केली.

Eman-photo-1-701x526

४ मे २०१७ला इमान ८२ दिवस मुंबईत राहिल्यानंतर अबूधाबीला रवाना झाली. इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इमानला अबूधाबीला नेण्यात आलं.

Eman-Ahmed-on-way-to-airport

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter