पालकांनो असं ठेवा मुलांना जंतूंपासून दूर!

पालकांनी आपल्या मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या पाहिजेत. जंतूपासून कसं दूर राहावं, स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. म्हणूनचं बालरोगत्जज्ञ डॉ. चैताली लद्दड यांनी पालकांसाठी लहान मुलांनी संपूर्ण शरीराची स्वच्छता कशी राखावी यासाठी खास टीप्स दिल्यात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पालकांनी मुलांना स्वच्छतेची सवय लावणं फार गरजेचं असतं. त्यातच मोठं काम म्हणजे लहान मुलांना, जंतूपासून कशी काळजी घ्यावी हे समजावून देणं असतं. कारण मुलं जंतूना पाहू शकत नाहीत. जंतूपासून आजार पसरू नये यासाठी त्यांना स्वच्छता बाळगण्याची सवय करून दिली पाहिजे.

जंतू हे चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे असतात. जसं की प्रोबायोटीक्स जंतू हे चांगले जंतू मानले जातात तर बॅक्टेरिया, वायरस आणि इन्फेक्शन पसरवणारे जंतू आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा प्रकारच्या जंतूमुळे घशाच्या समस्या होण्याची शक्यता असते.

जंतू नेमकं काय करतात?

हानिकारक जंतू एकदा का शरीरात गेले की बराच काळ ते शरीरात घर करून बसतात. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक ते नष्ट करतात आणि शरीरात घातक पदार्थ तयार करण्यासाठी उर्जा निर्माण करतात. परिणामी ताप, सर्दी, खोकला, कफ, डायरिया यांसारखे आजार उद्भवतात.

जंतूपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य त्या सवयी लावल्या पाहिजेत. जसं की, स्वच्छ हात धुणं, शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर रूमाल धरणं, हात धुतल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात न लावणं इत्यादी.

खाली दिलेल्या गोष्टींनुसार पालक आपल्या मुलांचं जंतूपासून संरक्षण करू शकतात

  • हवेच्या माध्यमातून जंतू त्वरित पसरू शकतात. जसं की खोकताना किंवा शिंकताना. याशिवाय घाम, रक्त, हात मिळवणं, दूषित पाणी पिणं यामुळे देखील जंतू पसरू शकतात. त्यामुळे याची काळजी घ्यावी
  • साबण आणि पाण्यामुळे जंतू कमी होतात. त्यामुळे पालकांनी मुलांना स्वच्छ हात धुण्याची सवय अवश्य लावावी
  • मुलांना प्राण्यांच्या थेट संपर्कात येण्यापासून टाळावं. प्राण्यांचे केस लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नसतात
  • आजारी व्यक्तीला पाहायला जाताना मुलांना सोबत घेऊन जाणं टाळा. लहान मुलांना संसर्ग लगेच होतो
  • खोकणं आणि शिंकणं यामार्फत जंतूचा प्रसार अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे मुलांना खोकतेवेळी आणि शिंकतेवेळी स्वच्छचा कशी पाळावी याबाबत समजूत द्यावी
  • जंतूपासून सुटका हवी असल्यास नियमितपणे मुलांची डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी
  • तुमच्या मुलांना शरीरासाठी योग्य असणारा आहार द्या. यासोबत पुरेशी झोपही महत्त्वाची आहे जेणेकरून मुलं आजारी पडणार नाहीत
  • तुमच्या घरात असणाऱ्या चादर, उश्यांची कव्हरं, कारपेट, मुलांची खेळणी नियमितपणे धुवून घ्या. घरातही नेहमी स्वच्छता ठेवा
  • अजून एक महत्त्वाचं म्हणजे घरातील बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter