हिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी!

हिवाळ्यामध्ये डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी माय मेडिकल मंत्राला तज्ज्ञांनी काही सोप्या टीप्स सांगितल्या आहेत.

0
53
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हिवाळा आता तोंडावर आला आहे.  त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतायत. अशावेळी डोळ्यांची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं असतं. थंडीमध्ये अनेकवेळा आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुक दिसतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, थंडीच्या दिवसांत हवा शुष्क असते त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं.

यासंदर्भात प्रिजम आय इन्स्टिट्युटचे डॉ. राहुल बैले यांच्या सांगण्यानुसार, “हवेतील परागकणांमुळे, प्रदूषणामुळे, आणि धुक्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची भीती असते. डोळे शुष्क पडणे, डोळ्यांना खाज येणे, पाणी येणे, लाल होणे या तक्रारी घेऊन अनेक रूग्ण माझ्याकडे येतात.”

हिवाळ्यात डोळ्यांसंबंधीच्या या तक्रारी उद्धभवतात

  • थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते.
  • डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात.

डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी टीप्स

  • डोळ्यांना सतत हात लावू नका
  • डोळे चोळू नका
  • प्रवास करताना गॉगल लावा
  • गाडी चालवताना हेल्मेट वापरा
  • कोमट पाण्याने डोळे धुवा
  • डोळ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी आय डॉप्स वापरा

याविषयी माय मेडिकल मंत्राशी बोलताना हाय टेक आय इन्स्टिट्यूटचे डॉ. सतांशू माथूर म्हणाले की, “अशा दिवसांत डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी बरेच उपाय आहेत.”

डॉ. माथूऱ यांच्या सांगण्यानुसार,

डोळ्यांमधला ओलावा जपा

थंडीत आपण शक्यतो हिटरचा वापर करतो. मात्र या हिटरच्या तापमानामुळे डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यांना खाज येण्याची दाट शक्यता असते. म्हणून डोळ्यांसाठी मॉइश्चरायझिंग आय ड्रॉपचा वापर करावा. तसंच हिटरच्या समोर बसताना थोडं अंतर ठेवावं.

युव्ही किरणापासून वाचण्यासाठी गॉगलचा वापर करा.

गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसांत सूर्य किरणांचा डोळ्यांवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे अशी समस्या आढळल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि घराबाहेर पडताना गॉगलचा वापर करा

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)