लहान मुलांच्या हृदयविकारांबाबत असणारे गैरसमज

प्रौढांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांपेक्षा लहान मुलांना होणारे हृदयासंबंधीचे आजार वेगळे असतात. त्यामुळे याबाबत अनेक गैरसमजुती आहेत. या सर्व गोष्टींची माहिती फोर्टीस रूग्णालयाचे कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक कार्डिओलॉजीस्ट डॉ. स्वाती गारेकर यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

१०० पैकी एका मुलाला हृदयविकाराचा त्रास असतो. प्रौढांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांपेक्षा हे आजार वेगळे असतात. बाळ आईच्या पोटात असताना त्याचं हृदय सामान्य पद्धतीने विकसित न झाल्यामुळे हे विकार बळावतात. मुलांमधील हृदयविकाराचं निदान लवकरात लवकर होणं महत्त्वाचं आहे. हृदयातील निदान न झालेला दोष वाढू शकतो आणि काही महिन्यात किंवा वर्षात त्यावर शस्त्रक्रिया करणं शक्य होत नाही. दोष कोणत्या प्रकारचा आहे यावर हे अवलंबून असतं. त्याचप्रमाणे हा दोष सुधारला गेला नाही, तर मुलाची वाढ अनेक मार्गाने खुंटली जाते.

हृदयातील दोष जन्मापूर्वी लक्षात येतो. गरोदरपणाच्या १८-२२ आठवड्यात, केलेल्या अल्ट्रासाउंडमधून हे लक्षात येण्यास मदत होते. याला ‘फेटल इको’ असे म्हणतात. गरोदर स्त्रीची अल्ट्रासाउंड केली जाते, त्याच पद्धतीने ही अल्ट्रासाउंडही केली जाते. फरक फक्त एवढाच की, पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट अल्ट्रासाउंडमध्ये दिसणारे हृदय आणि त्याच्या धमन्या मोठ्या करून त्यांचे निरीक्षण केलं जातं.

मुलाच्या हृदयात दोष असल्याचं निदान लवकर झालं की त्यापाठोपाठ त्यावर त्वरित उपचारही झाले पाहिजेत. हे उपचार म्हणजे कदाचित शस्त्रक्रिया असेल किंवा कॅथेटरायझेशन ही लॅबोरेटरीतील प्रक्रिया असेल किंवा औषधे आणि सतत फॉलो-अप घेत राहणं असेल.

लहान मुलांमधील हृदयविकाराबद्दलचे काही सामान्य गैरसमज:

हृदयातील सर्व छिद्रे मुले मोठी होतील तशी भरत जातात

मुलाचे आईवडील हृदयाचे छिद्र बुजण्याची वाट बघत राहतात, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. असा वेळ घालवल्यास मुलाच्या फुप्फुसांजवळील रक्तवाहिन्यांची कधीही भरून न येणारी हानी होते. त्यामुळे जे मूल शस्त्रक्रियेनंतर निरोगी आयुष्य जगू शकत होतं त्याला अकाली मृत्यू येऊ शकतो. हृदयातील काही विशिष्ट प्रकारची छिद्रं आपोआप भरली जातात. हृदयातील कोणते छिद्र आपोआप बुजतं हे पिडिअॅट्रिक कार्डिओलॉजिस्टनाच चांगल्या पद्धतीने समजू शकतं.

शस्त्रक्रियेपूर्वी बाळाचे वजन १० किलो व्हायला हव

हृदयात मोठी छिद्रं असलेल्या मुलांवर त्यासाठी शस्त्रक्रिया झाल्याशिवाय त्यांचे वजन वाढणारच नाही. हृदयात मोठे छिद्र असलेल्या एका ५ महिन्यांच्या बाळाचं वजन ४ किलो असेल, तर ते कदाचित कधीही १० किलो वजन गाठू शकणार नाही. १० किलो वजन हा गैरसमज आहे. कारण, मुलाच्या वजनाने पिडिअॅट्रिक हार्ट सर्जनला काहीही फरक पडत नाही. गरज भासल्यास २ किलो वजनाच्या बाळावरही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

छिद्र औषधांनी बुजू शकतं

हृदयातील कोणतेही छिद्र औषधांनी बुजू शकत नाही.

माझ्या बाळाच्या हृदयात छिद्र आहे. त्यामुळे ते रडू नये याची काळजी मी घेतली पाहिजे

मुलांच्या हृदयातील छिद्रामुळे किंवा मुलांमधील बहुतेक हृदयविकारांमुळे कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत.

माझ्या बाळाच्या हृदयात छिद्र असल्याने नुकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालीये. त्याच्या आहारात लोणी किंवा तेल किंवा पनीर येणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल

कोणत्याही सामान्य मुलाप्रमाणेच हृदयदोषासाठी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. त्यांच्या मेदू व शरीराच्या वाढीसाठी हे पदार्थ गरजेचे आहेत.

मी गरोदरपणात काहीतरी ूक केल म्हणून माझ्या बाळाच्या हृदयात दोष निर्माण झाला आहे.’

गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात हृदय तयार होतं. हृदयात दोष का निर्माण होतात, यावर बरेच संशोधन झालंय आणि सुरूये. मात्र, यातील फार थोड्या बाबी गरोदर स्त्रिच्या हातात असतात. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यानंतर ती जे काही करते त्याचा बाळाच्या हृदयावर नक्कीच परिणाम होत नाही, कारण, त्याच्या हृदयाची रचना पूर्वीच झालेली असते. ४.५व्या ते ५व्या महिन्यात फेटल एकोकार्डिओग्राम करून घेणे उत्तम कारण, यात मोठे हृदयदोष दिसून येतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter