अकाली टक्कल पडलं? मग हृदयरोगाचा धोका अधिक

वयाच्या तिशीत आजकाल पुरुषांना टक्कल पडण्यास सुरूवात होते. तर, काहींचे केस अकाली पांढरे होतात. संशोधकांच्या मते कमी वयात टक्कल पडणं, केस पांढरे होणं यामुळे हृदयरोगाची शक्यता केसांची समस्या नसणाऱ्यांपेक्षा पाच पटींनी वाढते. लठ्ठपणापेक्षा ही दोन कारणं हृदयरोगाच्या समस्येसाठी जास्त कारणीभूत आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वयाच्या तिशीतच डोक्यावरचे केस उडालेत? टक्कल पडलयं? लहान वयातच केस पांढरे झालेत? मग जरा तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या. संशोधकांच्या मते, लहान वयातच टक्कल पडणे, केस पांढरे होणं यामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

यासाठी संशोधकांनी भारतातील २००० व्यक्तींचं सर्व्हेक्षण केलं. या व्यक्तींना कमी वयातच टक्कल पडलं होतं किंवा त्यांचे केस अकाली पांढरे झाले होते. युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजिस्टचं हे संशोधन भारतातील कार्डियोलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक परिसंवादात मांडलं जाईल.

पण, ब्रिटीश हार्ट फाउंडेशनच्या मते यामुळे होणारे आजार यावर खासकरून लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

डॉ. माईक खाप्टन यांच्या म्हणण्याप्रमाणे, “ज्या व्यक्तींचे केस लवकर गळले किंवा अकाली पांढरे झाले त्यांच्या अभ्यासानंतर अशा व्यक्तींना ज्यांना हृदयरोगाची शक्यता जास्त आहे त्यांना शोधण्यास मदत होईल.”

अकाली केस पांढरे होणं

संशोधनासाठी शास्त्रत्रांनी वयाची चाळीळी गाठलेल्या ७९० लोकांचा अभ्यास केला ज्यांना हृदयाचा आजार होता. त्यांची तूलना १२७० समवयीन पुरुषांशी केली ज्यांना केसाची कोणतीच समस्या नव्हती. प्रक्तेकाची शारारीर तपासणी करण्यात आली.

संशोधकांच्या असं लक्षात आलं ही ५० टक्के पुरुष ज्यांचे केस अकाली पांढरे झाले होते त्यांना हृदयाचा आजार होता. तर केसाची कोणतीच समस्या नसणाऱ्या ३० टक्के पुरुषांना हृदयरोगाचा विकार होण्याची शक्यता होती. म्हणजे ज्यांना केसांची समस्या नव्हती त्यांच्या तूलनेत केसांची समस्या असणाऱ्यांना हृदयविकाराची समस्या ५ पट जास्त होती.

या संशोधनाचे प्रमुख डॉ. कमल शर्मांच्या म्हणण्याप्रमाणे, “काही व्यक्तींमध्ये शरीराचं वय लवकर वाढतं. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता जास्त असते.”

जपानमध्ये साल २०१३साली करण्यात आलेल्या संशोधनात ३२ टक्के टक्कल असणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराची समस्या असण्याची शक्यता असल्याचं संशोधनातून पुढे आलं होतं.

अहमदाबादच्या यूएन मेहता इंन्टीट्युटचे डॉ. धामदीप हुमणे यांच्या म्हणण्याप्रमाणे, “अकाली टक्कल पडलेल्यांनी हृदयविकाराकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यायाम, चांगला आहार आणि कामाचा कमी ताण यांची काळजीपूर्वक सांगड घातली पाहिजे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter