ई-सिगारेटमुळे लागतं धुम्रपानाचं व्यसन

ई-सिगारेटमुळे काही धोका नाही असा बहुतेकांचा समज असतो. मात्र ई-सिगारेटमुळे नेहमीच्या सिगारेटचं व्यसन लागत असल्याचं एका संशोधनातून पुढे आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नेहमीच्या सिगारेटचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून ई-सिगारेटकडे पाहिलं जातं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर ई-सिगारेटचा वापर केला जातो. पण ई-सिगारेटमुळे नेहमीच्या सिगारेटचं व्यसन लागत असल्याचं एका संशोधनातून पुढे आलंय. ब्रिटनमधल्या तरुणांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. धुम्रपानाचं व्यसन तरुणांमध्ये १९.९% टक्के तरुणांना सिगारेटचं व्यसन हे ई-सिगारेटमुळे लागल्याचं निदर्शनास आलंय.

अशाप्रकारचं संशोधन फक्त ब्रिटनमध्येच नाही तर अमेरिकेतही करण्यात आलं आहे. त्यामधूनही ई-सिगारेट ही धुम्रपानाच्या व्यसनाला कारणीभूत ठरत असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे ई-सिगारेटच्या जास्त वापरावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

ई –सिगारेटमध्ये निकोटीन हे द्रव्य वापरलं जातं. निकोटीनमुळेही शरिरावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासांमधून पुढे आलंय. पण या धोक्याकडे डोळेझाक केली जाते. “ई –सिगारेट हा सिगारेटसाठी उत्तम पर्याय आहे असंच, अनेकांना वाटतं. तसंच यामुळे काही दुष्परिणाम होणार नाहीत अशीही त्यांची समजूत असते. पण ई–सिगारेटमुळे होणारे तोटे अनेक आहेत,” असं मत श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. लान्सलोट पिंटो यांनी व्यक्त केलं.

“धुम्रपान घातकच आहे. मग साध्या सिगारेटला पर्याय म्हणून ई-सिगारेटचा वापर होऊ शकत नाही. ही बाब या संशोधनातून प्रकर्षानं पुढे आली आहे. त्यामुळे ई-सिगारेटला आपण विरोधच करायला हवा,” असं मत तंबाखूविरोधी चळवळीत सक्रीय असणारे डॉ.प्रकाश गुप्ता यांनी व्यक्त केलं.

“निकोटीनमुळे कॅन्सर जरी झाला नाही तरी याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे ई-सिगारेटवर बंदी घालणं गरजेचं आहे,” असं टाटा मेमोरिअल रुग्णालयातील सर्जन आणि तंबाखूविरोधी चळवळीमध्ये कार्यरत असणारे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)