जेवताना पाणी पिताय? ‘हे’ जरूर वाचा!

जेवताना थोड्या प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. आयुर्वेदाच्या नियमानुसार, जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने अन्नाचं पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

0
9878
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ए…जेवताना पाणी पिऊ नको..किती वेळा सांगितलंय…जर तुम्ही जेवताना पाणी प्यायलात तर हमखास आजी किंवा आजोबा तुम्हाला हे वाक्य आवर्जून सांगतात. आपण देखील मान डोलवत त्यांचं म्हणणं ऐकतो आणि पाणी पित नाही. मात्र जेवताना पाणी प्यावं की पिऊ नये याचा कधी विचार केलाय का? शिवाय जेवणाअगोदर आणि नंतर नेमकं कधी पाणी प्यावं?

आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार, जेवताना थोड्या प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. याशिवाय जबरदस्ती कधीही पाणी पिऊ नये. जर तहान असेल तर पाणी प्यावं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रीराम सावरीकर म्हणाले, “पाण्याच्या सेवनाचा आयुर्वेदामध्ये नियम आहे. या नियमाच्या अनुसार, जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असेल तर त्या व्यक्तीने जेवणाच्या आधी पाणी प्यावं. तर याउलट ज्या व्यक्तीला वजन वाढवायचं असेल त्या व्यक्तीने जेवणानंतर पाणी प्यावं. आपण शरीराला पाण्याच्या सेवनाबाबात अनेक सवयी लावून ठेवतो. सकाळी उठल्यावर पाणी प्यावं, रात्री झोपताना पाणी प्यावं मात्र अशा प्रकारच्या सवयी लावू नये.”

डॉ. सावरीकर पुढे म्हणाले की, “जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. जेवणादरम्यानही पाणी पिणं गरजेचं असतं. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार जेवणादरम्यान थोडं थोडं पाणी प्यावं. जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने अन्नाचं योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter