सर जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. अजय चंदनवाले

पुण्याच्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. जे.जे रुग्णालयाचं अधिष्ठाता पद गेले काही महिने रिक्त होतं. डॉ. चंदनवालेंनी गुरूवारी अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्विकारला.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पुण्याच्या ससून रुग्णालयात भरीव कामगिरी केल्यानंतर डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईच्या प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या सर जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. डॉ. चंदनवाले यांनी गुरूवारी मुंबईत अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्विकारला. जे.जे. रुग्णालयाचं अधिष्ठाता पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होतं.

डॉ. चंदनवाले यांची ससून रुग्णालयातील कारकिर्द वाखणण्याजोगी ठरली ती रुग्णांसाठी आणि रुग्णालयासाठी त्यांनी केलेल्या भरीव कामामुळे. रुग्णांचे हक्क, ससून रुग्णालयाचा कायापाटल करण्यामागे डॉ. चंदनवाले यांचा खूप मोठा हातभार आहे. डॉ. चंदनवाले जे. जे. रुग्णालयात अस्थिरोग विभागात प्रमुख म्हणून गेली सात वर्ष कार्यरत होते.

डॉ. अजय चंदनवाले यांनी आपल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ससून रुग्णालयात अमुलाग्र बदल केले. ससून रुग्णालयात रुग्णांना योग्य आणि वेळीच उपचार मिळावे यासाठी त्यांनी विविध विभाग सुरू केले. डॉ. चंदनवाले यांच्या मार्गदर्शनासाठी ससूनमध्ये पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णांना सरकारी रूग्णालयात अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सीएसआरच्या (Corporate Social Responsibility) अंतर्गत खूप बदल केले. राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यायांमध्ये सर्वात सीएसआर डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्णालयासाठी आणला.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबईतील जे.जे समूह रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले की, रूग्णांना उच्च दर्जाची सेवा देणं आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षणं देणं ही माझी प्राथमिकता असेल. त्याचसोबत येणाऱ्या काळात जे.जे रूग्णालयामध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी एक विशेष कार्यक्रम सुरु करण्याचा विशेष मानस आहे.”

रुग्णालयात रुग्णांची योग्य तपासणी व्हावी, रुग्णांना चांगलं पौष्टीक खाणं मिळावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

सर जे.जे रुग्णालयाचं अधिष्ठाता पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होतं. डॉ. मुकुंद तायडे यांना प्रभारी अधिष्ठाता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. तायडे पुन्हा आपल्या मूळ पदी म्हणजेच जीटी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू होतील.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter