‘या’ सवयीने होईल झोपेची काशी

अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी फोनचा वापर आणि झोप याबाबत हे सर्व्हेक्षण केलं. यासाठी त्यांनी ६५० मोबाईल वापरणाऱ्यांकडून माहिती मिळवली. या संशोधनातून हे आढळून आलं की एक मिनीट फोनचा जास्त वापर एका तासाची झोपमोड करतो. त्यामुळे संशोधकांनी झोपेच्या एक ते दोन तास आधी फोनचा वापर बंद करण्याचा सल्ला दिलाय

0
2678
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दिवसभर आपण तासनतास मोबाईलचा वापर करतो. काहींना दर मिनीटाने मोबाईल पाहण्याची सवय असले. सवय..काय व्यसन लागलेलं असतं. फोन दूर झाला तर जीव कासाविस होतो. दिवसभरात आपण फोनचा कितीही वापर करू. अगदी झोपताना एक मिनिट का होईना आपण फोन सुरू करतो. सोशल मिडिया आणि वॉट्सअॅप पाहून मगचं आपण झोपायला जातो.

पण, तुम्हाला माहितेय एक मिनिट फोनचा जास्त वापर तुमच्या एका तासाच्या झोपेचं खोबरं करतोय. खरं नाही वाटत..मग ही बातमी वाचा.

अमेरिकेतील कॅनिफोर्निया सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी ६५० स्मार्टफोन वापरणाऱ्यांवर संशोधन केलं. या संशोधनातून त्यांना असं लक्षात आलं की दिवसभरात एक मिनिट फोनचा जास्त वापर १ तासाची झोपमोड करतोय. हे संशोधन PLOS One या जर्नलमध्ये छापण्यात आलंय.

संशोधकांनी दिवसभर फोन वापरणाऱ्या, फोनचा अतिवापर करणाऱ्या आणि अगदी झोपतानाही फोन पाहणाऱ्या लोकांकडून त्यांची माहिती मागितली. फोनचा अतिवापर करणाऱ्या लोकांची झोप योग्य पद्धतीने होत नाही. तर, झोपेच्या आधी फोन वापरणाऱ्यांची झोपही योग्य पद्धतीने होत नाही असं संशोधकांच्या लक्षात आलं.

डॉ. निपूण वर्मांच्या म्हणण्याप्रमाणे, अगदी दिवसभरात एक मिनिट जास्त मोबाईल वापरल्यास १ तासाची झोपमोड होते. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, फोनमधून येणारा लाइट मेंदूला अजूनही झोपायची वेळ झाली नाही असा संकेत पाठवतो. यामुळे मेंदूला नक्की काय करायचं हे कळत नाही. त्यामुळे झोप लागल्यानंतरही झोप शांत लागत नाही किंवा योग्य पद्धतीने लागत नाही.

त्यामुळे संशोधकांच्या सल्ल्यानुसार, झोपेच्या एक ते दोन तास आधी फोन किंवा लॅपटॉपचा वापर बंद करा. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल.

सोर्स-प्रिव्हेन्शन

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter