जागतिक रक्तदाता दिन- रक्तदान करताय? या चुका करू नका…

14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून ओळखला जातो. तर यंदाच्या जागतिक रक्तदाता दिनी स्वतः रक्तदान करत इतरांना देखील प्रोत्साहन द्या. मात्र रक्तदान करताना कोणत्या चुका करणं टाळाल याची माहिती कल्याणच्या फोर्टीस रूग्णालयाचे डॉ. संदीप पाटील यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं. वैद्यकीय क्षेत्रात रक्तदानाला खूप महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या रक्तदानाने दुसऱ्याचा जीव वाचण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलचं पाहिजे असं आवाहन केलं जातं. मात्र अनेकजण रक्तदान कऱण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामागचं कारण म्हणजे रक्तदानाविषयीचा माहिती अभाव. रक्तदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तींच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे ‘मला काही होणार नाही ना?’…मात्र जर काही गोष्टींचं पालन करत रक्तदान केलं तर कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.

मुळात रक्तदान ही साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. त्यामुळे रक्तदान करताना तुम्ही खाली देिलेल्या चुका अवश्य टाळल्या पाहिजेत

रक्तदानाची तयारी करून न येणं

 • रक्तदात्याने प्रथम स्वतःशी ठरवलं पाहिजे की आपल्याला रक्तदान करायचं आहे
 • रक्तदान करण्यापूर्वी आरोग्याला पोषक असे पदार्थ खा
 • रक्तदान कऱण्याच्या आधीच्या रात्री सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घ्या
 • जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर रक्तदान कऱण्याच्या दोन तास अगोदर धुम्रपान करू नका
 • रक्तदान कऱण्यापूर्वी 24 तास आधी मद्यपान करणं टाळा
 • 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचं वजन किमान 45 असणं गरजेचं

रक्तदानाचा फॉर्म न भरणं

 • रक्तदान करण्यापूर्वी त्यासंबंधीचा फॉर्म भरा. आणि या फॉर्ममध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची य़ोग्य उत्तर द्या
 • सुरक्षित रक्तदान कऱण्यासाठी फॉर्ममध्ये दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं द्या

रक्तदान कऱण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी न करणं

रक्तदान करण्यापूर्वी जर तुमचं वजन 45 किलोंपेक्षा जास्त असलं तरीही तुमचा रक्तदाब तपासणंही गरजेचं आहे. यासाठी रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांची भेट घ्या. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी रक्तदान कऱणार आहात तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर डॉक्टरांनी होकार दिला तरच रक्तदान करा.

हिमोग्लोबिनची तपासणी न करणं

रक्तदान कऱण्यापूर्वी तुमच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी तपासली जाते आणि त्यावरून तुम्ही रक्तदान करू शकता की नाही हे ठरवलं जातं. यासाठी प्रत्येक रक्तपेढ्याची वेगळी पद्धत असते. मात्र प्रत्येकाच्या हिमोग्लोबिनची पातळी 12.5g/dL किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं असतं.

मन आणि डोकं शांत न ठेवणं

रक्तदान करताना डोकं आणि मन शांत ठेवणं गरजेचं आहे. जर ब्लड बॅग आणि रक्तदानासाठी वापरली जाणारी सुई नवीन असेल तर काळजी कऱण्यासारखं कोणतंही कारणं नसतं. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा रक्तदान करत असाल तरीही काळजी करू नका कारण रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून यासंबंधीची काळजी घेण्यात येते.

रक्तदान करताना स्वतःची काळजी न घेणं  

 • रक्तदान करताना शांत स्नायू रिलॅक्स होतील अशा स्थितीत झोपा. पायावर पाय ठेऊ नका
 • काही दुखत असेल तर मोठ्याने सांगा
 • हातात दिलेला स्पंजचा बॉल सतत दाबत रहा

रक्तदान केल्यानंतर आराम न करणं

 • रक्तदान केल्यानंतर देखील 10 मिनिटं पडून रहा. जेणेकरून तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल
 • उठण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तुमच्या हातावर बँडेज लावायला सांगा

रक्तदान केल्यानंतर खाण्याकडे दुर्लक्ष करू नका

 • रक्तदान केल्यानंतर पाणी, ज्यूस, बिस्किट किंवा केळी खा. शक्यतो रक्तदान केल्यानंतर या गोष्टी दात्याला दिल्या जातात.
 • कठीण काम करणं शक्यतो टाळा
 • रक्तदान केल्यानंतरही योग्य ती काळजी घ्या
 • रक्तदानानंतर पोषक घटकांचं सेवन करा
 • रक्तदान केल्यानंतर तो संपूर्ण दिवस मद्यपान किंवा धु्म्रपान करू नका

रक्तदाना अनुभव इतरांना न सांगणं

तुम्ही केलेल्या रक्तदानाचा अऩुभव इतरांना सांगा आणि त्यांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter