मुंबई तुंबली! डॉक्टर धावले मदतीला

सायन रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी जवळपास २०० डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रात्री राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली.

0
180
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मंगळवारी देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. सामान्यांचे हाल झालेच, मात्र रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचेही हाल झाले. सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कर्मचारी आणि इतर डॉक्टरांसाठी तात्काळ राहण्याची जागा आणि खाण्या-पिण्याची सोय केली.

पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. मुंबईचं जवजीवन ठप्प झालं. स्टेशन तर बसस्टॉपवर मुंबईकर अडकून पडले. मुंबईच्या सायन रुग्णालयातही डॉक्टर आणि कर्मचारी पावसामुळे अडकले. यांच्या मदतीसाठी निवासी डॉक्टर पुढे सरसावले. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या डॉक्टरांनी, रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि डॉक्टरांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली.

IMG-20170829-WA0036

मार्डने जवळपास २०० डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रात्री राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना सायन रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवाटकर म्हणतात, “माणूसकीपेक्षा मोठं काहीच नाही. आमच्यासाठी आमचे कर्मचारी सर्वस्व आहेत. त्यामुळे आम्ही कर्मचारी आणि इतर डॉक्टरांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. आम्हाला सर्वांची सुरक्षा महत्त्वाची होती.”

मार्डच्या डॉक्टरांच्या या पुढाकाराबाबत सायन रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर कारिया म्हणतात, “ही आमची मुलं आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ही मुलं इथे आली आहेत. या मुलांनी जो निर्णय घेतला तो त्यावेळी महत्त्वाचा होता. या निर्णयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.”

माय मेडिकल मंत्राशी बोलताना सायन रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर म्हणतात, “अशा परिस्थितीत लोकांना मदत मिळणं गरजेचं आहे. आम्ही रुग्णालयाकडून जास्तीत-जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter