‘आई’ तुला स्तनपानाचं महत्त्व माहीत हाय काय?

पुण्याच्या डॉ. सरिता भागवत यांनी स्तनपानाचं महत्त्व सांगणारं एक गाणं बनवलं आहे. सध्या प्रचंड प्रसिद्ध असलेल्या ‘सोनुच्या’ गाण्याचा ताल धरुन त्यांनी स्तनपानाचं महत्त्व सांगितलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सोनूचा कुणावर भरोसा असो किंवा नसो, डॉ. सरिता भागवत यांनी बनवलेलं हे गाणं पाहिल्यावर मात्र स्तनपानाच्या महत्त्वावर तुमचा भरोसा नक्की बसेल. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा कालावधी आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पाश्वभूमीवर स्तनपानाविषयी जागरुकता पसरवण्याच्या हेतूनं डॉ. सरिता भागवत यांनी सोनू तुला मायावर भरोसा नाय काय च्या चालीवर गाणं बनवलं आहे. डॉ. सरिता भागवत ह्या पुण्यात स्तनपान समुपदेशक म्हणून काम करतात. त्याचसोबत ब्रेस्ट फिडींग प्रोमोशन नेटवर्क ऑफ इंडिया या संस्थेच्या महाराष्ट्रातील शाखेशी गेले १५ वर्ष संलग्न राहून त्या काम करताहेत.

डॉ.सरिता भागवत, स्तनपान समुपदेशक
डॉ.सरिता भागवत, स्तनपान समुपदेशक

या गाण्याच्या माध्यमातून अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी स्तनपानाचं महत्त्व समजवून सांगितलं आहे. बाळाला स्तनपान द्यायला कधी सुरुवात करावी, स्तनपानादरम्यान कोणती काळजी घ्यावी आणि आईच्या दुधाचं महत्त्व त्यांनी या गाण्यातून मांडलं आहे.

सोनू तुला मायावर भरोसा नाय काय  हे गाणं संपूर्ण देशात प्रचंड प्रसिद्ध झालंय. हे गाणं ताल धरायला लावणारं असल्याने सगळ्यांच्याच तोंडावर याचे बोल आलेत. या धर्तीवर गाणं बनवण्याविषयी बोलताना डॉ. सरिता भागवत म्हणाल्या, “हे गाणं प्रसिद्ध झाल्यापासून त्यावर गाणं बनवण्याचं माझ्या डोक्यात होतंच. स्तनपानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी याचा मोठाच उपयोग होणार होता. तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं हे गाणं मी बनवलं.”

डॉ. सरिता भागवत यांचं गाणं बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा..

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter