‘ती’ला घरी सोडताना डॉक्टरांचेही डोळे पाणावले

गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात जन्मलेलं पहिलं बाळ आज घरी निघालंय. पुण्यातील गॅलेक्सी केअर रूग्णालयात 18 ऑक्टोबर रोजी देशात पहिल्यांदा गर्भाशय प्रत्यारोपणानंतर बाळाचा जन्म झाला. आणि तब्बल सव्वा दोन महिन्यांनंतर आई आणि बाळाला डिस्जार्ज देण्यात आलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आज ‘ती’ घरी निघालीये…गेले दोन महिने तिचं घर म्हणजे पुण्यातील गॅलेक्सी केअर रूग्णालय हेचं होतं…रूग्णालयातील डॉक्टरांसाठीही ती रूग्ण नसून त्यांच्या कुटुंबियांप्रमाणे एक होती…आज तिला घरी सोडताना रूग्णालयातील डॉक्टरही भावूक झाले…देशात पहिल्यांना गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्मलेल्या राधाला डॉक्टरांनी गुरुवारी डिस्चार्ज दिलाय…राधाला निरोप देताचा क्षण जितका डॉक्टरांसाठी आनंदाचा होता तितकाच तो भावनिकही होता.

गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात जन्मलेलं पहिलं बाळ आज घरी निघालंय. पुण्यातील गॅलेक्सी केअर रूग्णालयात 18 ऑक्टोबर रोजी देशात पहिल्यांदा गर्भाशय प्रत्यारोपणानंतर बाळाचा जन्म झाला. आणि तब्बल सव्वा दोन महिन्यांनंतर आई आणि बाळाला डिस्जार्ज देण्यात आलाय.

19 मे 2017 रोजी गुजरातमधील बडोद्याजवळ राहणाऱ्या 27 वर्षीय मिनाक्षी वालंदवर गॅलेक्स केअर रूग्णालयात गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गर्भातील दोषामुळे मिनाक्षीला मूल होत नव्हतं. यामुळे तिच्या आईनेच तिला गर्भाशय दान केलं. त्यांनंतर IVF तंत्रदानाच्या सहायाने ती गर्भवती झाली. गर्भाशय प्रत्यारोपणातून जन्मलेलं हे देशातीलच नव्हे तर आशियातील खंडातील पहिलं बाळ आहे. गर्भवती झाल्यापासून गेले 10 महिने मीनाक्षी पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्येच राहत होती. आणि अखेर गुरुवारी मिनाक्षी तिच्या मुलीला म्हणजेच राधाला घेऊन घरी परतणार आहे.

मिनाक्षीवर प्रत्यारोपण केलेल्या या गर्भशयातून दुसरं मूल होण्याचाही पर्याय आहे. येत्या 6-8 महिन्यांमध्ये मिनाक्षी आणि तिच्या पतीला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. अडीच वर्षांनंतर हे प्रत्यारोपित गर्भाशय काढून टाकावे लागणार आहे. यासंदर्भात बोलताना मिनाक्षी आणि तिच्या पतीच्या सांगण्यानुसार, अजून दुसऱ्या बाळाचा विचार केला नाहीये. राधा थोडी मोठी झाल्यावर याबाबत निर्णय घेणार आहोत.

गॅलेक्सी केअर रूग्णालयाचे डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणाले की, “राधाचा जन्म झाला त्यावेळी तिचं वजन 1450 ग्रॅम होतं. तिची फुफ्फुसही पुरेशी सक्षम नव्हती. तिला आईपासूनही दूर ICU मध्ये ठेवण्यात आलेलं. आईचं दूधही नाकावाटे नळीतून तिला देण्यात येत होतं. यादरम्यान तिला एकदा कावीळही झाली आणि एका रात्री अचानक तिचा श्वासोच्छ्वास बंद पडला होता. या दोन घटनांमुळे आमच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मात्र नंतर हळूहळू तिचं वजन वाढलं आणि आता ते 2650 ग्रॅम झालंय. शिवाय ती स्वतःच्या शक्तीने आईचं दूध पिऊ शकते.”

पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये ओपीडी सुरू करण्यात आली. याओपीडीमध्ये आतापर्यंत 700 पेक्षा जास्त महिला येऊन गेल्यात. तर आतापर्यंत 6 गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अजून 12 महिलांचे गर्भशाय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी सगळी कागदपत्रं तयार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter