‘डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड’ डॉक्टरांचा आयएमएच्या संपाला पाठिंबा नाही

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या विरोधात एक दिवसाचा संप पुकारलाय. लाखो डॉक्टर संपावर गेलेत. पण, डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्डच्या डॉक्टरांनी या संपाला समर्थन दिलेलं नाही. डिएनबीचे ३०,००० डॉक्टर या संपात सहभागी होणार नाहीयेत. संघटनेच्या ट्विटर हँडलवर संपात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लाखो डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारलाय. यामुळे रुग्ण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण, डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्डच्या डॉक्टरांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड संघटनेच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आलीये.

DSe_iyTUQAArCee

डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड अध्यक्षा डॉ. सपना सिंह,

  • नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचं स्वागत करतो
  • आम्ही संपामध्ये सहभागी होणार नाही
  • पण डीएनबी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत
  • निती आयोगाने आणि रणजित रॉय चौधरी समितीने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि नॅशनल मेडिकल कमिशनचं पोस्ट ग्रॅज्युएट बोर्डाचं एकत्रीकरण करण्याचं सुचवलं आहे
  • पण लोकसभेत सादर केलेल्या विधेयकात याबाबत उल्लेख नाही
  • दोन पोस्ट ग्रॅज्युएट बोर्ड आणि पीजी क्विलिफिकेशन यामुळे येणाऱ्या काळात भेदभाव आणि भ्रष्टाचार वाढेल
  • आमची मागणी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि नॅशनल मेडिकल कमिशनचं पोस्ट ग्रॅज्युएट बोर्डाचं एकत्रीकरण करण्याची आहे
  • या विधेयकाला आमची सहमती आहे, पण काही गोष्टींवर चर्चा करून बदल होणं गरजेचं

डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड संघटनेचे ३०,००० डॉक्टर या संपात सहभागी होणार नाहीयेत. सकाळी सुरू झालेल्या संपाला आता सात तास उलटलेत. पण, अजूनही रुग्ण व्यवस्थेवर याचा परिणाम झालेला नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter