मधुमेह आणि लठ्ठपणामुळे वाढतो कर्करोगाचा धोका

कर्करोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारे मधुमेह आणि लठ्ठपणा या दोन्ही आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. जगभरातील कर्करोगाची ५.६ टक्के प्रकरणं ही मधुमेह आणि बॉडी मांस इंडेक्स जास्त असण्याशी संबंधित आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लठ्ठपणा आणि मधुमेह हे दोन्ही आजार संपूर्ण जगभरात पहायला मिळतायत. अनेक संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, कर्करोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारे मधुमेह आणि लठ्ठपणा या दोन्ही आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय.

अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून अशा माहिती मिळालीये की, जगभरातील कर्करोगाची ५.६ टक्के प्रकरणं ही मधुमेह आणि बॉडी मांस इंडेक्स जास्त असण्याशी संबंधित आहेत. तर यापैकी ३.९ प्रकरणं ही मधुमेहामुळे तर यापैकी दुप्पट प्रकरणं ही बॉडी मांस इंडेक्समुळे होताना आढळली.

डॉ. जोनाथान पिअर्सन स्टुटार्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केलं.या संशोधनामध्ये पुढील वर्षांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या मुळे कर्करोगाची किती प्रकरण पाहायला मिळतील याचा अंदाज लावण्यात आला.

गेल्या वर्षीच्या लॅन्सेटच्या अहवालानुसार, जगभरात जवऴपास ४२२ दशलक्ष लोकांना मधुमेहाची समस्या होती. २.०१ टक्के व्यक्तीचं वजन जास्त होतं तर काही जण लठ्ठपणाने ग्रस्त होते.

अनेक प्रकारच्या कर्करोगाचं प्रमुख कारणं हे मधुमेह आणि लठ्ठपणा आहे. जसं की, कोलोन, स्वादुपिंड, यकृत, स्तनांचा कर्करोग.

या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक डॉ. जोनाथान पिअर्सन स्टुटार्ड यांच्या सांगण्यानुसार, “चयापचय क्रियेशी संबंधीत असणाऱ्या आजारांचा प्रसार वाढलाय. यामुळे कर्करोगाच्या प्रकरणांत देखील वाढ होतेय. त्यामुळे यासंदर्भातील उपचार आणि आजारांचं प्रतिबंध कसा करावा यावर भर देणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तींला चांगल्या आहार मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून मधुमेह आणि लठ्ठपमा या आजारांवर प्रतिबंध मिळवता येईल.”

कर्करोगाची आकडेवारी पाहता, १९८० ते २००२ मध्ये १७५ देशांमध्ये मधुमेह आणि जास्त बॉडी मास इंडेक्स संबंधित १८ प्रकरच्या कर्करोगांच्या प्रकरणांत वाढ होताना दिसून आली. कर्करोगाचं जास्त प्रमाण हे पाशिमात्य देशांमध्ये(३८.२ टक्के) अधिक आढळलं. तर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करोगाचं प्रमाण कमी आहे.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, १९८० ते २००२ या सालामध्ये मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली होती त्यामुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्येही २६.१ टक्यांनी वाढ झाली तर ३१.९ टक्के प्रकरणांची वाढ ही जास्त बॉडी मास इंडेक्समुळे झाली.

कर्करोगाच्या प्रकरणांची संख्या ही २०२५ पर्यंत ३० टक्क्यांहून अधिक वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

डॉ. जोनाथान पिअर्सन स्टुटार्ड यांनी पुढे सांगितलं की, “मधुमेह आणि बॉडी मास इंडेक्समध्ये वाढ झाली की कर्करोगाच्या प्रकऱणांत देखील वाढ होते. यासाठी चयापचय क्रियेशी संबंधीत असणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शिवाय या आजारांमुळे होणाऱ्या कर्करोगाविषयी जागृती करणंही आवश्यक आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter