मधुमेहामुळे दातांचं आरोग्य बिघडतं, अशाप्रकारे घ्या काळजी

मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच. मधुमेहामुळे मुखाचं आरोग्य बिघडतं हे खूप कमी लोकांना माहिती आहे. याविषयी अधिक माहिती दिली आहे डॉ. आरती शर्मा यांनी.

0
91
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यांच्यामुळे बरेच आजार बळावतात. यामधील एक प्रमुख आजार म्हणजे मधुमेह. या आजारात शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीत बिघाड होतो. परिणामी रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

ज्या व्यक्तींना मधुमेह असतो त्यांच्या डोळ्यांवर, रक्तवाहिन्या, किडनी तसंच हृदय यांच्यावर देखील गंभीर परिणाम होतो. मात्र अनेकांना हे माहित नाही की, मधुमेहामुळे मुखाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. शिवाय यामुळे मुखासंबंधीच्या अनेक समस्या उद्धभवू शकतात.    

जर तुमचा मधुमेह नियंत्रणात नसेल तर तोंडातल्या लाळेत गलुकोजचं प्रमाण वाढतं आणि तोंडात जंतू निर्माण होतात. मधुमेहाचा परिणाम हा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो आणि ती कमी होते. शिवाय त्याचा हिरड्यांवर देखील परिणाम होतो. यामुळे दातांच्या मुळाशी जंतू निर्माण होतात. परिणामी चावताना अडथळा येतो आणि दात पडण्याचा धोका बळावतो.

जर तुमचं तोंड कोरडं पडत असेल तर हे मधुमेहाचं लक्षणं असू शकतं. आणि यामुळे अल्सर, संसर्ग तसचं दात किडणं या समस्या जाणवतात. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हे त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतात.

तुम्हाला मधुमेहामुळे तोंडाच्या समस्या आहेत, हे कसं ओळखाल?

मधुमेहामुळे तोंडाच्या समस्या निर्माण होत आहेत, का यासाठी तुमच्या तोंडाची तपासणी करा. अशावेळी हिरड्या सुजणं, हिरड्यांतून रक्तस्राव होणं हे त्रास उद्भवतात. अनेकवेळा हिरड्यांसंबंधी कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहीवेळ गंभीर लक्षणे दिसत नाहीत तोवर रूग्णांना समजत नाही. यासाठी वर्षातून दोन वेळा दातांची तपासणी करून द्यावी.    

मुखाचं आरोग्य जपण्यासाठी काय कराल?

मुखाचं आरोग्य़ सुधारण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड ग्लुकोजवर नियंत्रण ठेवणं. ज्या रूग्णांचा मधुमेह नियंत्रणात नसतो त्यांना हिरड्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात.

यावर उपचार

  • दिवसातून दोन वेळा दात घासा
  • नियमित दातांची तपासणी करा
  • रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं

दातांच्या डॉक्टरांकडे जाताना काय कराल?

  • दातांचं काम करताना रक्तातील साखरेच्या नियंत्रणाबाबत डॉक्टरांशी आधी चर्चा करून घ्या
  • जर तुम्ही इन्सुलिन वर आहात किंवा मधुमेहाची औषधं घेत असाल तर दातांचं काम करण्याअगोदर त्यांच्या वेळा चुकवू नका
  • तुमची औषधं आणि खाणं तुमच्या सोबत दवाखान्यात घेऊन जा
  • जर मधुमेह नियंत्रणात नसेल तर डॉक्टरला भेटण्याची वेळ पुढे ढकला
  • भीतीमुळे डॉक्टरांची भेट टाळू नका
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter