नव्या हृदयासह धनश्रीचा प्रवास सुरु

जालन्याच्या साडेचार वर्षांच्या धनश्रीला अखेर हृदय मिळालंय. तब्बल 14 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर या साडेचार वर्षांच्या चिमुरडीला हृदय मिळालंय. धनश्रीवर मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कऱण्यात आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

“हृदय मिळावं याकरिता मी दिवसरात्र एक केली…माझ्याकडून  जे जे शक्य होतं ते मी केलं. मनात एकच ध्यास ठेऊन तो म्हणजे धनश्रीसाठी हृदय मिळवायचं. गेले 14 महिने मी झटलो या एकाच गोष्टीसाठी. आणि आज ती गोष्ट सत्यात उतरतेय. आणि याचा आनंद काय असतो तो मी आज अनुभवलाय.” चेहऱ्यावरील आनंदाश्रू पुसत कृष्णा मुजमुले बोलत होते.

धनश्रीचे वडील आज त्यांचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. मात्र चेहऱ्यावरील आनंद आणि त्यामुळे पाणावलेल्या डोळ्यांमधून त्यांचा आनंद स्पष्ट झळकत होता.

शुक्रवारचा दिवस उजाडला तो मुजमुले कुटुंबीयांसाठी आनंद घेऊन…जी गोष्ट ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुर होते..ती गोष्ट आज त्यांच्या कानावर पडली..धनश्रीला हृदयदाता मिळाल्याचा फोन आला होता.

जालन्याच्या साडेचार वर्षांच्या धनश्रीला अखेर हृदय मिळालंय. तब्बल 14 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर या साडेचार वर्षांच्या चिमुरडीला हृदय मिळालंय. धनश्रीवर मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कऱण्यात आली.

गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून धनश्री हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. धनश्रीला डायलेटेड कार्डियोमायोपॅथी हा गंभीर आजार झाला होता. रूग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, धनश्रीचं हृदय केवळ 15 टक्के कार्यरत होतं.

हृदय मिळाल्याचा आनंद धनश्रीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी धनश्रीचे वडील कृष्णा मुजमुले हा आनंद व्यक्त करताना म्हणाले की, “आज मला फार आनंद होतोय. मला किती आनंद झालाय तो मी व्यक्तही करू शकत नाही. ज्या दिवसाची आम्ही गेले अनेक दिवस आम्ही वाट पाहत होतो तो दिवस अखेर आज आलाय. धनश्रीला अखेर हृदय मिळालं ज्यामुळे तिला नव्याने जीवनदान मिळालंय.”

मुंबईतल्या फोर्टीस हॉस्पिटलच्या विभागीय संचालक एस नारायणी म्हणाल्या की, “अखेर धनश्रीला हृदय मिळालंय. आम्ही फार आनंदात आहोत.”

कृष्णा मुजमुले पुढे की, “ज्या कुटुंबीयांनी त्याग करून माझ्या मुलीला नव्याने आयुष्य दिलंय त्यांचा मी ऋणी राहीन. त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयानेच आज धनश्री माझ्या सोबत आहे.पुढील 48 तास धनश्रीला I.C.U मद्धे ठेवण्यात येईल” फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. अन्वय मुळे , सर्व सहकारी आणि प्रशासनाचा मी आभारी आहे.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter