#SaveDhanashree: मुलीला वाचवण्यासाठी आई-वडिलांची भारतीयांना साद

जालन्यात राहणारी साडेचार वर्षांची धनश्री मुजमुले. धनश्रीला हृदयाचा गंभीर आजार असून सध्या तिचं हृदय केवळ 15 टक्के कार्यरत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे. यासाठी येणारा तीस लाखांचा खर्च मुजमुले कुटुंबीयाना परवडण्यासारखा नाहीये. त्यामुळे आता त्यांनी क्राऊड फंडींगचा मार्ग स्विकारत पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलाय.

0
506
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

साडेचार वर्षांची धनश्री मुजमुले…खेळण्याबागड्याच्या वयात धनश्री हॉस्पिटलच्या फेऱ्या करतेय, औषधं आणि इंन्जेक्शनही घेतेय. त्यासाठी कारणंही तसंच… धनश्रीला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. तिला कार्डियोमायोपॅथी हा हृदयाचा गंभीर आजार असून सध्या तिचं हृदय केवळ 15 टक्के कार्यरत आहे. प्रत्यारोपणासाठी दाता शोधण्यासोबतच शस्त्रक्रियेसाठी लागण्याऱ्या पैशांचं गणितही जुळण्याचा प्रयत्न सध्या मुजमुले कुटुंबीयांकडून सुरु आहे.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये धनश्रीला अचानक पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवला. डॉक्टरांनी औषधं देऊनही तिला बरं न वाटल्याने औऱंगाबादच्या एका रूग्णालयात नेलं. त्यावेळी तपासण्यांच्या माध्यमातून हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. त्यावेळी डॉक्टरांनी धनश्री वाचणार नाही असचं सांगितलं. मात्र मुजमुले कुटुंबीयांनी दुसऱ्या डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर त्या डॉक्टरांकडून यासाठी प्रत्यारोपण हा एकच मार्ग असल्याचं सांगितलं.

याविषयी माय मेडिकल मंत्राशी बोलताना धनश्रीचे वडील क्रिश्णा मुजमुले म्हणाले की, “हा आजार काय असतो आणि हृदय प्रत्यारोपण म्हणजे काय याबद्दल त्यावेळी आम्हाला काहीच माहिती नव्हतं. औरंगाबादमधील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही तिला मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात आणलं. त्यावेळी डॉक्टरांनी औषधोपचार केले”

क्रिश्णा पुढे म्हणाले की, “धनश्रीच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. तिचं हृदय केवळ 15 टक्के कार्यरत आहे. तिच्यावर प्रत्यारोपण हा एकच पर्याय आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार यासाठी तीस लाख रूपये खर्च येणार आहे. मात्र हा खर्च आम्हाला अजिबात परवडण्यासारखा नाहीये. त्यामुळे आता आम्ही पैसे जमवण्याचा प्रयत्न करतोय.”

क्रिश्णा यांचं जालन्यात आयुर्वेदीक औषधांचं दुकान आहे. तसंच शेती हा देखील त्यांचा व्यवसाय असून महिन्याला जवळपास 20 हजार रूपये घर चालवण्यासाठी मिळतात. त्यामुळे अचानक ३० लाख रूपये उभे करणं ही मुजमुले कुटुंबीयांसाठी फार कठीण काम आहे.

क्रिश्णा यांच्या सांगण्यानुसार, “पैसे जमवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. आता पुढे इतर ट्रस्टना भेटून मदतीबाबत विचारण्यात येणारे. हृदय मिळण्यासाठी दाता मिळावा यासाठी ४-५ दिवसांपूर्वी रजिस्ट्रेशनही केलंय. डॉक्टर जेव्हा सांगतिल तेव्हा धनश्रीला मुंबईत आणणार आहे. धनश्री अशक्त असल्याने मुंबईत आणल्यावर आम्ही इथेच राहण्याचा विचार केलाय.”

फोर्टिस रुग्णालयातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गारेकर यांनी सांगितलं की, “धनश्रीला कार्डियोमायोपॅथी हा हृदयाचा आजार आहे. तिचं हृदय आता 15 टक्के कार्यरत आहे. कार्डियोमायोपॅथी रूग्णावर आम्ही प्रथम औषधोपचार करतो. यामुळे रूग्ण बरा झाला तर शस्त्रक्रियेची गरज लागत नाही. धनश्रीवर देखील औषधोपचार करण्यात आले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. तिला दोन आठवड्यांतून एकदा रूग्णालयात दाखल करावं लागतं. ही चांगली लक्षणं नाहीत. त्यामुळे आता धनश्रीवर हृदय प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे.”

धनश्रीची आई कल्पना मुजमुले म्हणाल्या, “जेव्हा धनश्रीला या आजाराचं निदान झालं त्यावेळी आम्हाला या आजाराबाबत काहीही माहिती नव्हतं. सध्या धनश्रीला १५ दिवसांनी रूग्णालयात न्यावं लागतं. शिवाय तिला श्वास घेतानाही थोडाफार त्रास जाणवतो.”

धनश्रीला आर्थिक मदत करण्यासाठी-

बँकेचा तपशील

  • Krishna g. Mujmule
  • IDBI bank Jalna branch
  • Account no- 0530104000054214
  • Ifsc code – IBKL0000530
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter