तिच्या पोटात सापडली १० वर्षांपूर्वी अडकलेली तार!!

पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने ती डॉक्टरांकडे गेली. पण आश्चर्य म्हणजे तिच्या पोटात दात मागे करण्यासाठी लावण्यात येणारी तीन इंचाची तार सापडली. ही तार दहा वर्षांपासून तिच्या पोटात अडकली होती.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्याला अनेकदा शरीराच्या कोणत्याही अवयवाचं दुखणं सहन होत नाही. डोकेदुखी असो, पाठदुखी असो किंवा मग पोटदुखी. अपचन, गॅस, अॅसिडिटी, पोटफुगी, आतड्यांचे दुखणे यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटदुखी उद्भवते. अशाच काहीशा सहनशक्ती पलीकडील पोटदुखीमुळे एक महिला पुरती हैराण झाली होती. तिच्या पोटदुखीचं कारण जर तुम्ही वाचलं तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

ही महिला पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आली होती. यावेळी महिलेच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा वेगाने पडत होते. डॉक्टरांनी या महिलेच्या काही तपासण्या केल्या. तसंच तिच्या यकृताच्या आणि पित्ताशयाच्या देखील चाचण्या करण्यात आल्या. मात्र, तपासणीत डॉक्टरांना दोष आढळून आला नाही.

याविषयी बोलताना डॉ. तलिया शेफर्ड सांगतात, “सगळ्या तपासण्या केल्यानंतर आम्ही तिच्या किडनीची देखील तपासणी केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर तिचं सिटी स्कॅन करण्याचं ठरवलं. यावेळी तिच्या आतड्यामध्ये काहीतरी आढळून आलं. तिच्या आतड्यांमध्ये 3 इंचाची दातांसाठी (brace) वापरण्यात येणारी तार अडकली होती.”

डॉ. शेफर्ड पुढे सांगतात की, “हे पाहून आम्ही सगळेच पहिल्यांदा गोंधळून गेलो. असं काही आतड्यांमध्ये अडकलं असेल असा आम्ही विचारही केला नव्हता. पहिल्यांदा मला या महिलेच्या आतड्यामध्ये माशाचा काटा अडकला असल्याची शक्यता वाटत होती.”

या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने जवळपास 10 वर्षांपूर्वी दातांना तार लावली होती. मात्र तिने तार गिळल्याचं किंवा तार हरवल्याचं तिला आठवत नव्हतं. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून या महिलेच्या आतड्यांमधील तार काढण्यात आली.

शेवटी डॉ. शेफर्ड सांगतात की, “हे खूप दुर्मिळ प्रकरण होतं. कारण एखाद्या व्यक्तीने असं काही गिळलं तर ते त्वरित लक्षात येण्यासारखं असतं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter