देहू : कुष्ठरुग्णांना शालेय विद्यार्थ्य़ांची साथ

कुष्ठरोगाबाबत जनजागृतीसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना देहू प्राथमिक आरोग्य केंद्रानंही पुढाकार घेत एक वेगळा उपक्रम राबवला आहे. 3 शालेय विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला आहे. हे विद्यार्थी प्रत्येक शाळेत जाऊन कुष्ठरोगाबाबत माहिती देत आहेत.

0
279
person suffering from leprosy
Leprosy and its myths
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

जागतिक कुष्ठरोग दिनापासून राज्यात कुष्ठरोग पंधरवडा सुरू आहे. तसंच स्पर्श मोहिमेंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कुष्ठरोगाबाबत माहिती देऊन कुष्ठरुग्णांसोबत भेदभाव न करण्याची प्रतिज्ञा घेतली जात आहे. कुष्ठरोग जनजागृतीसाठी राज्य सरकार असे विविध प्रयत्न करत असताना देहू प्राथमिक आरोग्य केंद्रानंही कुष्ठरोग जनजागृतीसाठी पुढाकार घेत एक वेगळा उपक्रम राबवला आहे.

देहू प्राथमिक आरोग्य केंद्रानं शालेय मुलांमार्फत अवयवदानाची जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. शाळेतील 3 मुलांचा एक गट तयार केला आहे. ही तीन मुलं प्रत्येक शाळेत जाऊन अवयवदानाबाबत जनजागृती करत आहेत.

dehu phc leprosy awareness

याबाबत माय मेडिकल मंत्राला माहिती देताना देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. किशोर यादव म्हणाले, कुष्ठरोगाबाबत अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही. कुष्ठरुग्णांसोबत आजही भेदभाव केला जातो. जेव्हा लहान मुलं एखाद्या गोष्टीची जनजागृती करतात तेव्हा त्याचा परिणाम चांगला होतो. त्यामुळे आम्ही 3 मुलांचा गट केला आहे. कुष्ठरोग म्हणजे काय आणि त्यावरील उपचार याबाबत ही मुलं माहिती देतात. पुढील 2 आठवडे आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter