#YogaDay2019- जाणून घ्या, नियमित योगासने करण्याचे फायदे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नियमित ‘योगासने’ करणे हे शरीर स्वास्थासाठी नेहमी उत्तम असते. दररोज योगासने केल्याने रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. काहीवेळा एखादा आजार हा फक्त योगाभ्यास केल्याने संपूर्णपणे बरा होऊ शकतो. शिवाय योगासनाचे फक्त शरीराला नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदे होतात. पाहूयात योगासनांचे विविध फायदे –

 शारीरिक फायदे

योगासने करण्याचा जास्तीत जास्त फायदा हा शरीराला आणि शरीराच्या अवयवांना होतो. योगासने करताना त्यातील आसनांचा आणि श्वसनक्रियेचा फायदा शरीरातील अवयवांना होतो. योगासने केल्याने शरीर संतुलित तसेच लवचिक बनते. यासोबतच रक्तदाब, नाडीचे ठोके आणि कोलेस्ट्रॉल यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

 मानसिक फायदे

नियमित योग केल्याने मनावर तसेच आपल्या भावनांवर नियंत्रण मिळणे शक्य होते. शिवाय योग केल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

 स्थूलपणा कमी होतो

काही योगासने शरीराचा स्थूलपणा कमी करण्यास मदत करतात. दररोज सूर्य नमस्कार घातल्याने वजन कमी होते. त्यामुळे स्थूलपणातून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्य नमस्कार करणे फायदेशीर ठरते.

 हृदयाचे आरोग्य सुधारते

योगासनांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. योगासने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेस मदत करतात.

 रक्तदाबावर नियंत्रण राहते

आजकाल अनेक जणांमध्ये रक्तदाबाची समस्या आढळून येते. याचे एकच कारण ते म्हणजे तणाव. मात्र नियमितपणे योगासने केल्याने या आजारांपासून सुटका होऊ शकते. यासाठी शवासन, ध्यान तसेच बलासन ही आसनं हितकारक ठरतील.

 मधुमेही रुग्णांना फायदेशीर

शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास मधुमेहाचा धोका होण्याची शक्यता असते. मात्र योगासनांच्या सहाय्याने शरीरात इन्सुलिनची संवेदनशिलता वाढते. त्यामुळे मधुमेहींसारख्या रुग्णांना प्राणायाम, वज्रासन, हलासन, चक्रासन या आसनांचा फायदा होतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter