#WorldObesityDay – जंकफूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणा

जंक फूडसंबंधीच्या जाहिरीती दाखवणं कमी केल्यास तरूणांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण कमी होतं. एका संशोधनाच्या माध्यमातून असं स्पष्ठ करण्यात आलंय. शिवाय या जाहिराती दाखवणं कमी केल्याने मधुमेह, हृदयासंबंधीचे आजार आणि कर्करोग यांच्या प्रमाणातही घट होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आई मला वेफर्स हवे त्या जाहिरातीत आहेत ना तसे…बाबा ही चॉकलेटची अॅड बघा मला उद्या आणून द्याल का? लहान मुलांनी एखाद्या खाण्याच्या वस्तूची जाहिरीत पाहिली थेट दुसऱ्या दिवशी ती गोष्ट त्यांना घरात हवी असते. आजकाल प्रत्येकाच्या घरी हीच परिस्थिती असते. यामुळे मुलं जंक फूडचं सेवनही अतिप्रमाणात करतात जे आरोग्यासाठी फार घातक आहे.

नुकत्याचं केलेल्या एका संशोधनानुसार, जंक फूडसंबंधीच्या जाहिरीती दाखवणं कमी केल्यास तरूणांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण कमी होतं. शिवाय या लठ्ठपणामुळे बळावणारे आजार जसं की, मधुमेह, हृदयासंबंधीचे आजार आणि कर्करोग यांच्या प्रमाणातही घट होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, जगभरात लहान मुलांमध्ये जास्त वजनाची समस्या वाढताना दिसतेय. ही आकडेवारी १९९० मध्ये ३२ दशलक्ष होती तर १०१६ मध्ये ४१ दशलक्ष इतकी त्यात वाढ झालीये.

जंक फूडच्या जाहिराती आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती यामध्ये संबंध पडताळून पाहण्यासाठी संशोधकांनी अभ्यास केला. यामध्ये ११ ते १९ वयोगटातील ३,३४८ मुलांना खाण्याविषयी आणि जाहिराती पाहण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले.

यावरून संशोधकांच्या असं लक्षात आलं की, जी मुलं जंक फूडच्या जाहिराती पाहत होती ती मुलं त्या पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करत होती.

संधोधाकांच्या सांगण्यानुसार, जी मुलं दिवसांतून दोन तीन तासांहून अधिक काळ टीव्हीवरील जाहिराती पाहतात त्यांच्या आहाराच्या पद्धती चुकीच्या आहेत. ही मुलं शरारीसाठी योग्य नसलेल्या जंक फूडचं अधिक सेवन करतात. जसं की, बिस्किट, फॅटयुक्त पदार्थ, शितपेय इत्यादी.

यासंदर्भात कॅन्सर रिसर्च युकेच्या संशोधक ज्योत्ना वोहरा म्हणतात की, “जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलं अतिप्रमाणात जंक फूडचं सेवन करतात. आम्ही असं म्हणत नाही की जाहिराती पाहणारा प्रत्येक मुला जंक फूडचं सेवन करतो.”

जंक फूडच्या अतिप्रमाणातील सेवनामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर जंक फूडच्या जाहिराती कमी केल्या तर मुलांमध्ये जंकू फूड सेवनाचं प्रमाणही कमी होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)