मानसिक आरोग्य: वेळीच उपचार मिळला आणि त्याचा घटस्फोट टळला

आपल्या पतीच्या एका सवयीच्या त्रासाला कंटाळून ती पत्नी घटस्फोट घ्यायला निघाली होती. पण मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला घेतल्यावर समजलं की, ती पतीची सवय नव्हती, तर मानसिक आजार होता.

0
52
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पिकू हा चित्रपट आठवतो? यामध्ये अमिताभ बच्चन यांनी सारखी चिडचिड करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीची भूमिका केली होती. आपल्याला कुठला तरी आजार झाला आहे या भावनेतून ते त्यांच्या मुलीला (दीपिका पादुकोणला) जेरीस आणत असतात. आपल्याला कुठला तरी आजार आहे, ही एक प्रकारची मानसिक आजाराची स्थिती आहे आणि त्याला हायपरकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत आपल्याला हसवलं खरं, पण ज्या व्यक्तींना  हायपरकॉन्ड्रिया आहे त्यांच्या खाजगी आयुष्यात यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

असाच अनुभव मुंबईतील ५० वर्षीय दिवाकर कपूर (नाव बदललेलं) यांना आला. मला कुठला तरी आजार आहे असं त्यांना सारखं वाटायचं. त्यांच्या या तक्रारीला त्यांची पत्नी कंटाळली आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. शेवटी दिवाकर यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्यात आलं.

याविषयी अधिक सांगताना पी.डी हिंदुजा रूग्णालयाचे डॉ. कर्सी चावडा म्हणाले की, “कपूर ज्या पद्धतीने बोलायचे ते फार विचित्र वाटायचं. कपूर सातत्याने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या दुखण्यासंबंधी तक्रार करत असतं. यासाठी त्यांच्या बऱ्याच तपासण्याही केल्या मात्र काही आढळून आलं नाही. त्यांना डोळ्याचा कोणताही त्रास नव्हता. मात्र तरीही ते सातत्याने तक्रार करत असत. यासाठी त्यांची पत्नी फार वैतागली होती. शिवाय त्यांच्या मुलाने देखील त्यांच्याशी बोलणं बंद केलं”

डॉ. कर्सी पुढे सांगतात की, “कपूर यासाठी पत्नीसोबत माझ्याकडे आले. आम्हाला त्यांची भिती घालवायची होती. या सततच्या त्रासाने कपूर ऑफीसला ही जाणं टाळत होतं. त्यांच्या एचआरने त्यांना मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितल्याने तेव्हा ते माझ्याकडे आले होते.”

या आजारामध्ये सगळ्या वैद्यकीय चाचण्या नॉर्मल येऊनही त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. अशा व्यक्तीच्या मनाची खात्री होण्यासाठी डॉक्टरांना सारख्या चाचण्या कराव्या लागतात. हायपरकॉन्ड्रिया हा आजार तुरळकपणेच आढळून येतो. पण याचा त्याचा व्यक्तीच्या जवळच्या लोकांना खूप त्रास होतो. याविषयी बोलताना डॉ कर्सी चावडा म्हणाले की, “महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीच्या आम्हाला सातत्याने तपासण्या कराव्या लागत होत्या. जेणेकरून आम्हाला समजेल की खरचं त्याला काही दुखापत आहे की नाही.”

दिवाकर कपूर यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्यामध्ये सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या मानसिक स्थितीविषयी अधिक माहिती देताना मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणाले की, “खरचं, हायपरकॉन्ड्रिया हा आजार सहसा आढळून येत नाही. ज्या व्यक्ती जास्त चिडचिड करतात त्यांच्यामध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)