तरूण मुलींमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन चिंताजनक

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आजकाल तरूण मुली आणि महिलांमध्ये वाढतोय. मात्र याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम महिलांनी जाणून घेतले पाहिजे. याचीच माहिती दिलीये पुण्यातील मदरहूड रूग्णालयाच्या प्रसूती सल्लागार डॉ. मोहिता गोयल यांनी.

0
522
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लैंगिक संबंधामध्ये असुरक्षिततेचं प्रमाण वाढताना दिसतंय. तरूण मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येतं. अनेक मुली सध्या त्यांच्या लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी या मुली डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि त्यांना या गोळ्यांच्या घातक परिणामांबद्दल काहीच माहिती नसते.

गर्भनिरोधक गोळ्यांना मॉर्निंग पिल्स असेही म्हणतात. या गोळ्यांमध्ये लेव्होनोरजेस्ट्रेल हे प्रोजेस्टरॉन असते. ही गोळी औषधाच्या दुकानात मिळते आणि या पाकिटात दोन गोळ्या असतात. असुरक्षित लैंगिक संबंध राखल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी लवकरात लवकर किंवा ७२ तासांच्या आत घेण्यात यावी. ही गोळी गर्भधारणा केली असल्यास घ्यावी आणि महिन्यातून एकदाच घेतली जावी.

आजकाल मुली या गोळ्या महिन्यातून अनेकदा घेतात आणि कधीकधी कोणत्याही प्रकारची लैंगिक कृती केल्यावर घेतात. या गोळीचे परिणाम आणि साईड इफेक्ट्स याची या मुलींना काहीच कल्पना नसते. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याआधी महिलांचं योग्य प्रकारे समुपदेशन होणं आवश्यक आहे.

या गोळ्यांचा वापर केल्यामुळे होणारे परिणाम- 

  • अनियमित रक्तस्त्राव
  • अनियमित पाळी
  • मळमळ
  • उलट्या
  • स्तनांना सूज येणं
  • शरीर सुजणं
  • वजन वाढणं
  • स्वभावात तीव्र चढउतार होणं

या गोळ्या औषधाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने मुलींमध्ये लैंगिक संबंध राखण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे लैंगिक संक्रमित आजारांचे आणि एचआयव्हीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. म्हणून या गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा वापर आणि साईड इफेक्ट्स यांची माहिती घ्यावी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter