‘या’ अॅलर्जीबाबत तुम्हाला माहितीये का?

धूळ आणि मातीप्रमाणे साबण, लोशन या गोष्टींचीही अॅलर्जी होते. या समस्येला वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस असं म्हणतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अनेकांना धूळ किंवा माती यांच्या संपर्कात आलं की लगेच अॅलर्जी होते. मात्र तुम्हाला माहितीये साबण, लोशन किंवा भाजी यांची देखील अॅलर्जी होऊन हातावर रॅशेस येऊ शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस असं म्हणतात.

मुंबईत राहणाऱ्या 25 वर्षीय सुलेखा पाटील (नाव बदलेलं) यांना साबण वापरताना, भाजी कापताना किंवा फळं कापताना त्रास जाणवायचा. या गोष्टी हाताळल्यावर त्यांच्या बोटाला सुरकुत्या पडायच्या आणि बोटांना जळजळ व्हायची. शिवाय हाताची त्वचा सुकी पडून खाज यायची. हा त्रास अधिक जाणवू लागल्याने सुलेखा त्वचारोग तज्ज्ञांकडे गेल्या. त्यावेळी त्यांना कॉन्टॅक्ट डर्मेटायटीसची समस्या असल्याचं सांगितलं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना नायर हॉस्पिटलच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक म्हणाल्या, “कॉन्टॅक्ट डर्मेटायटीसमध्ये व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला अॅलर्जी होते. अशावेळी हात किंवा पायांना रॅशेस येतात. यामध्ये काही व्यक्तींना साबण, शॅम्पू किंवा इतर गोष्टींमुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्या व्यक्तींना ही समस्या असते त्यांनी त्या गोष्टी हाताळताना ग्लोव्हजचा वापर करावा. किंवा ज्या गोष्टींची अॅलर्जी आहे त्यांच्यापासून शक्यतो दूर राहावं.”

या घटकांमुळे कॉन्टॅक्ट डर्मेटायटीस होण्याची शक्यता असते

  • हेअर डाय
  • दागिन्यांमध्ये वापरले जाणारे काही घटक
  • लेदर किंवा रबर
  • लिंबूवर्गीय फळं
  • साबण, शॅम्पू, कॉस्मेटीक वस्तू, लोशन, पर्फ्य़ुम
  • काहींना एखादं औषधं हातावर घेतल्यावरही अॅलर्जी होऊ शकते
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter