World Hypertension Day – जिने चढा, रक्तदाब नियंत्रणात आणा

उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधोपचारांची मदत घ्यावी लागते. मात्र, नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, जिने चढण्यामुळे हायपरटेन्शचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. संशोधनानुसार, रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये जिने चढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हायपरटेन्शन ही सध्या संपूर्ण जगभराची समस्या झाली आहे. शिवाय उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार जसं की, मधुमेह, स्ट्रोक, हृदयाचे आजार इत्यादी जडण्याचीही शक्यता असते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधोपचारांची मदत घ्यावी लागते. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, जिने चढण्यामुळे हायपरटेन्शचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

जर्नल मेनोपॉज यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार, रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये जिने चढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. यासोबतच या महिलांच्या पायामधील स्नायू मजबूत राहून पायांमधील क्षमता टिकून राहण्यास मदत होते.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, यापूर्वी केलेल्या अभ्यासातून महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन या हार्मोनची कमतरता निर्माण होते. परिणामी महिलांना रक्तवाहिन्यांसंबंधी आणि स्नांयूंच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

हे पडताळून पाहण्यासाठी संशोधकांनी रजोनिवृत्ती आलेल्या काही महिलांचा अभ्यास केला. यासाठी त्या महिलांना आठवड्यातील जवळपास चार दिवस ट्रेनिंग देण्यात आलं. तर दिवसातील दोन ते पाच वेळा १९२ जिने चढण्यास सांगितलं.

संशोधनाच्या अखेरीस असं समजलं की, जिने चढल्यामुळे व्यक्तीची अधिक प्रमाणात शारीरिक हालचाल होते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊन हृदयाला रक्तपुरवठा कऱण्याऱ्या रक्तवाहिन्या देखील योग्यरित्या कार्यरत राहतात. त्यासोबतच पायांचे स्नायू मजबूत झाल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होतो.

यासंदर्भात क्लिवलँडच्या नॉर्थ अमेरिकन मेनोपॉजल सोसायटीचे कार्यकारी संचालक जॉन यांच्या सांगण्यानुसार, या अभ्यासाच्या जिने चढल्यामुळे रोजनिवृत्तीमुळे होणारे नाकारात्मक परिणाम कमी होतात. तसंच रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये हायपरटेन्शनचा धोका कमी होऊन

संशोधकांच्या सांगण्यानुसार, शारीरिक हालचालीसह व्यक्तींनी आहारात थोडेफार बदल केले तरीही उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते. त्यासाठी विशेष म्हणजे व्यक्तींनी आहारात मिठाचं कमी करावं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)