World Schizophrenia Day – …तर नवजात बालकांना स्क्रिझोफ्रेनिया धोका

बाळांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्यास भविष्यात या मुलांना ‘स्क्रिझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो, अशी धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

जन्मलेल्या बाळामध्ये जर ड जीवनसत्त्व कमी असेल तर त्यांना स्क्रिझोफ्रेनिया होण्याचा धोका वाढतो. हे ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल, मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनाच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. डेन्मार्कच्या ‘Aarhus University’ आणि ऑस्ट्रेलियामधील‘युनिर्व्हसिटी ऑफ क्वीनलॉड’ या संस्थांनी याबाबात संशोधन केलंय.

The journal scientific Reports या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय. डेन्मार्कमध्ये नव्याने जन्मलेल्या ज्या नवजात बालकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता होती त्यापैकी अंदाजित 8 टक्के लहान मुलांना मोठेपणी स्क्रिझोफ्रेनिया असल्याचं समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, डेन्मार्क मध्ये 1981-2000 मध्ये जन्मलेल्या साधारणतः 2,602 जणांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आलं होतं. यात जन्माच्या वेळी ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असणाऱ्या मुलांच्या रक्ताची नमूने घेऊन चाचणी करण्यात आली. या सर्वेक्षणात 44 टक्के मुलांमध्ये मोठेपणी स्क्रिझोफेनिया विकार असल्याचं निदान झालंय.

स्क्रिझोफेनिया हा विकार का होतो? याबद्दल अद्यापही कुठल्याही संशोधनातून स्पष्ट झालेलं नाही. परंतु, अनेकदा हा विकार अनुवांशिक असू शकतो.

यासंदर्भात माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल भातांब्रे यांनी सांगितलं की, “प्रत्येकांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता दिसून येते. यामुळे मेंदूत काही बदल होत असल्याने व्यक्तीमध्ये नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते. 10 टक्के लोकांमध्ये ही समस्या दिसून येते. सध्या ‘ड’ जीवनसत्व व बी 12 जीवनसत्त्व कमी असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ‘ड’जीवनसत्वे फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोवळ्या ऊन्हात फिरलं पाहिजे.’’

शीव रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर कारिया यांनी सांगितलं की, ‘‘’ड’ जीवनसत्वाची कमतरता असणं हे सर्वसाधारण आहे. लोकसंख्येच्या तुलनेत 10 पैकी 9 जणांमध्ये ‘ड’ जीवनसत्व कमी असतं. यामुळे भविष्यात स्क्रिझोफेनिया हा आजार होण्याची शक्यता असते. आमच्याकडे असं अनेक रुग्ण येतात. या रुग्णांवर व्हिटॅमिन डी ची मात्रा असलेले औषधोपचार सुरू करतो. याशिवाय शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व वाढण्यासाठी सूर्य किरणांसह मासे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातोय. जेणेकरून व्यक्तीच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्वांची कमतरता भरून काढता येऊ शकते.’’

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)