उन्हाळ्यात अशी घ्या मुलांच्या त्वचेची काळजी

उन्हाळी सुट्टी पडली की लहान मुलं घराबाहेरच खेळतात. भर उन्हात खेळल्यानं मुलांना त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अरे उन्हात जास्त खेळू नको, आजारी पडशील… उन्हाळी सुट्टी पडल्यानंतर लहान मुलं असलेल्या प्रत्येक घरात पालकांचं हे वाक्य असतं… मात्र मुलं त्याकडे कानाडोळा करतात… वर्षभराच्या अभ्यासानंतर इतक्या दिवसांची सुट्टी एंजॉय करणं मुलं कशी काय सोडतील… त्यामुळे उन्हात खेळणाऱ्या या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी ही पालकांची भर उन्हात राहिल्यानं मुलांच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यांनाही त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांना त्वचेच्या समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. सूर्याच्या अतिनील किरणांपासून म्हणजे यूव्ही रेजपासून मुलांच्या त्वचेचं संरक्षण कसं कराल याबाबत पालकांना काही टीप्स.

भर उन्हात घराबाहेर पाठवू नका

शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी पुरेशा सूर्यप्रकाश मिळायला हवा. मात्र सकाळी १० नंतर मुलांना घराबाहेर सोडणं चांगलं नाही. यावेळेत उन्हाच्या झळा जास्त लागतात. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मुलांना घरातच खेळू द्या.

हायड्रेट ठेवा

उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या धारा तर निघतात, याशिवाय तापलेल्या सूर्यामुळे त्वचेतील आद्रताही कमी होते. ज्यामुळे कोरडेपणा येऊन त्वचेला भेगा पडू शकतात. त्यामुळे मुलांची त्वचा नियमित हायड्रेट कशी राहिल हे पाहा. जास्त केमिकल नसलेले असे मॉईश्चरायझर मुलांच्या त्वचेला लावा.

चेहऱ्याला संरक्षण द्या

उन्हाळ्यात मूलं घराबाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्याला संरक्षण मिळेल याची काळजी घ्या. हॅट, सनग्लासेस वापण्याचा सल्ला द्या. कारण डोळ्यांभोवतालची त्वचा शरीरावरील इतर भागावरील त्वचेपेक्षा कमी जाडीची असते.

सनस्क्रिन लावा

उन्हात बाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रिन लावा. घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटं ते अर्धा तास आधी सनस्क्रिन लावा.

अंघोळ

घाम आणि धुळीमुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात, ज्यामुळे घामोळ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे मुलं बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना अंघोळ घालावी, ज्यामुळे त्याचं शरीर तर स्वच्छ होईलच शिवाय शरीराचं तापमानही कमी होईल आणि त्यांना थंडावा मिळेल.

योग्य कपडे घाला

उन्हाळा म्हटलं की सौम्य रंगाचे आणि आरामदायी कपडे मुलांना घालावेत. ऊन लागेल म्हणून भरपूर कपडे घालू नयेत, ज्यामुळे मुलांना त्वचेच्या समस्या निर्माण होतील. सुती कापड घातल्यास त्यांच्या शरीराला हवाही मिळेल.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter