बोगस डॉक्टरांच्या जाहिराती दाखवणं होणार बंद

टीव्हीवरील जाहिरातीत स्वत:ला वैद्य, डॉक्टर किंवा गुरू म्हणवणारे रुग्णांना बरं करण्याचा दावा करतात. रुग्ण डॉक्टरांना न विचारता ही औषध घेतात. या जाहिरातीतली माहिती काहीवेळा चुकीची असते. त्यामुळे या औषधांनी रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सध्या टीव्हीवर आपल्याला आयुर्वेद आणि होमियोपॅथी औषधांच्या जाहिराती पाहायला मिळतात. या जाहिरातीपाहून अनेक रुग्ण औषधं खरेदी करतात. पण, काहीवेळा या जाहिरातीत औषधांबाबतची चुकीची माहिती देण्यात आलेली असते. अशा जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी एडव्हर्टाइजिंग स्टँडर्ड काउंसिल ऑफ इंडियाने देशभरातल्या टीव्ही चॅनल्सना नोटीस बजावलीये.

एडव्हर्टाइजिंग स्टँडर्ड काउंसिल ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे, आयुष मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आलीये. न्यूज चॅनल्सच्या तपासणीत असं आढळून आलंय, की काही न्यूज चॅनल्सवर आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी औषधांबाबत चुकीची किंवा वाढवून-चढवून माहिती दिली जातेय. रुग्ण जाहिरातीला बळी पडून ही औषध घेतायत, जी त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहेत.

टीव्हीवरील या जाहिरातीत स्वत:ला वैद्य, डॉक्टर, गुरू म्हणवणारे अनेक लोकं, आपल्या औषधांनी रुग्णांना बरं करण्याचा दावा करतायत. या सर्वांवर आयुष मंत्रालयाचं लक्ष आहे, त्यामुळे केंद्र सरकारने टीव्ही चॅनल्सला याबाबत नोटीस बजावून सक्त ताकीद दिलीये.

आयुर्वेद, होमियोपॅथी डॉक्टरांनी टीव्हीवर येणाऱ्या या जाहिरातींबाबत केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्याच्या आयुर्वेद विभागाचे संचालक कुलदिप कोहली म्हणतात की, “केंद्र सरकारने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. पण याची अंमलबजावणी कशी होईल हे पाहावं लागेल. माहिती-प्रसारण मंत्रालयाने याबाबत कडक पाऊलं उचलली पाहिजेत. त्याचसोबत राज्याच्या अन्न आणि औषधी विभागाने याबाबत कारवाई केली पाहिजे”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter