उच्च रक्तदाब दिन- ‘हे’ खा, ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवा…

१७ मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. उच्च रक्तदाबासाठी योग्य आहार घेणंही तितकचं महत्त्वाचं असतं. चुकीच्या आहारमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कशी उद्भवू शकते याची माहिती मुलुंडच्या कंसलटंट फिजीशियन डॉ. संजय शहा यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

विचित्र लाईफस्टाईल, चुकीचा आहार आणि दररोजचा ताणतणाव यामुळे जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार होऊ लागलेत. त्यातलाच सायलेंट किलर म्हणजे उच्च रक्तदाब हा आजार. फक्त प्रौढ व्यक्तींमध्ये नाही तर उच्च रक्तदाब हा सध्या तरूणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अवेळी खाणं आणि शरीरासाठी उपयुक्त नसलेला आहार हा उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरतोय.

उच्च रक्तदाबाची आकडेवारी पाहिली तर शहरी भागातील २५ ते ३० टक्के आणि ग्रामीण भागातील १० ते २० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे.

उच्च रक्तदाब होण्यामागे असलेले इतर प्रमुख घटक म्हणजे,

 • वय
 • अतिरिक्त वजन
 • तंबाखूचं सेवन
 • अतिप्रमाणात मीठाचं सेवन
 • पोटॅशियमचं कमी प्रमाणात सेवन
 • मद्यपान
 • ताणतणाव
 • मधुमेह
 • किडनीचे विकार

मीठ आणि  उच्च रक्तदाब

आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की अतिरिक्त मीठाच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो. मात्र अतिप्रमाणात मीठ कमी करणं म्हणजे केवळ घरातील जेवणात मीठ कमी घालणं न्वहे तर प्रक्रिया केलेे आणि बाहेरील पदार्थही आपण कमी खाल्ले पाहिजेत. कारण बाहेरील पदार्थ किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये देखील ८० टक्के सोडियमचं प्रमाण असतं.

सोडियम जास्त असलेले पदार्थ,

 • भाजलेलं मासं
 • टोमॅटो ज्यूस
 • पेस्ट्री
 • बटाट्याचे वेफर्स
 • बिस्किटं
 • फास्ट फूड
 • लोणचं
 • सोया सॉस
 • पापड

मीठाच्या सेवनासंदर्भातील गैरसमज,

 • आपण फक्त घरातील जेवणामधून मीठाचं सेवन करतो
 • पिंक सॉल्ट किंवा काळ मीठ यांच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं
 • अतिरिक्त मीठाच्या सेवनाने मसल क्रॅप्स येत नाहीत
 • गोड पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं

खाली दिलेल्या घटकांमुळे रक्तदाबावर परिणाम होतो

पोटॅशियम

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियम आणि सोडियमचं संतुलन असणं गरजेचं आहे. यासाठी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करावं

साखर  

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका संभवतो. आणि लठ्ठपणाचा रक्तदाबावर परिणाम होतो.

मद्यपान

अतिरिक्त दारूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.

उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ खावेत

 • पालेभाज्या
 • ओटमील
 • केळी
 • लसूण
 • डार्क चॉकलेट
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter