कॅन्सरच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर कॅन्सरवर मात करणं शक्य आहे. यासाठी मुख्य म्हणजे कॅन्सरची लक्षणं समजणं जास्त गरजेचं आहे. यासाठीच फोर्टीस रूग्णालयाचे डॉक्टर अनिल हेरूर यांनी कॅन्सरची लक्षणं स्पष्ट करून दिलीयेत.

0
300
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कॅन्सर ही संपूर्ण जगभराची समस्या बनलीये. आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंदाजानुसार, भारतात २०२० पर्यंत १७.३ लाख कॅन्सरचे नवीन रूग्ण आढळून येतील तर ८.८ लाख व्यक्तींच्या मृत्यूचं कारणं हे केवळ कॅन्सर असेल.

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर कॅन्सरवर मात करणं शक्य आहे. यासाठी मुख्य म्हणजे कॅन्सरची लक्षणं समजणं जास्त गरजेचं आहे.

शौचास समस्या

जर तुम्हाला शौचास समस्या जाणवत असतील तर हे कॅन्सरचं लक्षणं असू असतं. अचानक उद्भवणारी समस्या जसं की, बद्धकोष्ठता, डायरिया, शौचाचा रंग बदलणं, शौच्यादरम्यान रक्तस्राव होणं ही कॅन्सरची लक्षणं मानली जातात. ही लक्षणं कोलोरेक्टल कॅन्सर किंवा मोठ्या आतड्याच्या कॅन्सरची असू शकतात.

दुखापत लवकर बरी न होणं

हाता पायाला झालेली जखम जास्तीत जास्त आठवड्याभरात बरी होते. मात्र जर तुम्हाला झालेली जखम लवकर भरून येत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्वचेवर किंवा जखमेवर लाल छोटी गाठ येणं तसचं शरीरावर पॅच येणं ही त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असतात. अशावेळी आपण एखादी जखम म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.

रक्तस्राव होणं

अनेकदा रक्तस्राव हा स्तनांमधून होताना आढळतो अशावेळी त्या व्यक्तीला स्तनांच्या कॅन्सरचं निदान करण्यात येतं. स्तनांचा कॅन्सर हा फक्त महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होण्याची शक्यता असते. १ टक्का स्तनांच्या कॅन्सरची प्रकरणं ही पुरुषांची असतात. त्यामुळे पुरुषांनीही काळजी घेणं आवश्यक आहे. याशिवाय मूत्राशयातून, योनीमार्गातून तसंच गुद्दवारातून रक्तस्राव होत असल्यास कोलोरेक्टल, सर्व्हायकल आणि प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वर्तवण्यात येते.

स्तन घट्ट होणं किंवा गाठ होणं

स्तनांची त्वचा जाड होणं तसंच स्तनांमध्ये गाठ असणं हे देखील कॅन्सरचं लक्षणं असतं. मात्र प्रत्येक गाठही कॅन्सरची गाठ नसते. अनेक व्यक्तींना गैरसमज असतो गाठ आढळली म्हणजे कॅन्सर झालाय. वेदना किंवा वेदनारहित दोन्ही प्रकारच्या गाठी या कॅन्सरच्या असतात.

अपचन, गिळताना त्रास होणं

जर तुम्हाला सातत्याने गिळताना त्रास होत असेल, खाताना घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं, वारंवार अपचन या तक्रारी उद्भवत असतील तर डॉक्टरांना भेट द्यावी. ही तोंड्याच्या, पोटाच्या आणि घशाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

कफ आणि आवाज बदलणं

आवाज बदलणं किंवा घोगरा होणं हे अनेक समस्यांचं कारणं असू शकतं. जर ही समस्या चार आठवड्यांनी पुन्हा जाणवत असेल डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्यावी. कारणं हे फुफ्फुस किंवा घश्याच्या कर्करोगाचं लक्षणं असू शकतं.

शिवाय खाली दिलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

  • वारंवार उलट्या होणं
  • खोकताना रक्त पडणं
  • सततची डोकेदुखी
  • हाडांचं दुखणं
  • थकवा आणि मळमळ
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter