‘६९ टक्के कॅन्सरग्रस्तांकडे उपचारासाठी पैसेच नाहीत’

कॅन्सर फायनॅनशियल प्रीपरीडनेस सर्व्हे असं याचं नाव आहे. या सर्वेक्षणानुसार देशात कर्करोगाची लागण झालेले ६९ टक्के रुग्ण हे पैसे नसल्यामुळे उपचार घेत नसल्याचे म्हटलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कॅन्सरवर होणाऱ्या उपचारांच्या संदर्भात फ्युचर जनरली इंडिया लाईफ इन्शुरस कंपनीने इप्सोस या आघाडीच्या संशोधन कंपनीशी करार करून एक सर्व्हे केला. कॅन्सर फायनॅनशियल प्रीपरीडनेस सर्व्हे असं याचं नाव आहे.

या सर्वेक्षणानुसार देशात कर्करोगाची लागण झालेले ६९ टक्के रुग्ण हे पैसे नसल्यामुळे उपचार घेत नसल्याचे म्हटलं आहे.

सर्वेक्षणानुसार हे मुद्दे समोर आले आहेत

  • ६९ टक्के लोकांकडे कर्करोगाच्या उपचारासाठी पैसेच नसतात
  • २१ टक्के लोकांनी आरोग्य विमा कवच घेतलेला होता
  • २६ टक्के उपचारासाठी कर्ज काढले होते
  • ३१ टक्के लोकांनी कर्करोगाशी लढण्यासाठी आर्थिक नियोजन केलेले होते
  • रुग्णालयात उपचार सुरू असलेले ६३ टक्के रुग्णांनी उपचारासाठी पैसे कसे जमा करता येईल याकरता कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता.

कर्करोगासंदर्भात जनजागृती, आर्थिक नियोजन याबाबी विचारात घेऊन हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, ११ शहरांमधील २५ आणि त्यावरील लोकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर बहुतांश रुग्णांना तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यांत आल्यावर कर्करोगाचे निदान झाल्याने उपचाराचा खर्च वाढतो, असंही यातून पुढे आलंय.

या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, कर्करोगावरील उपचारांचा खर्च उचलताना अनेक लोक त्यातून येणारा आर्थिक ताण विचारात घेत नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे नुकसान, कमावण्याची घटलेली क्षमता, फॉलोअप उपचाराचा खर्च कसा करायचा, याबाबत रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत असतात.

यासंदर्भात बोलताना फ्युचर जनरली इंडिया लाईफ इन्शुरस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुनिश शरदा म्हणाले की, “कर्करुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढताना दिसून येत आहे. पैसे नसल्याने रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. याकरिता लोकांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावत असून या सर्वेक्षणाचा हेतू लोकांपर्यंत पोहोचण्याचा आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter