पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात मुळव्याध रुग्णांसाठी शिबीर

मूळव्याध एक असा आजार जो म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. मात्र या आजारावर वेळीच उपचार तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. सध्या आधुनिक पद्धतीने म्हणजेच स्टेपरल सर्री दुबिर्णीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. मात्र आयुर्वेदिक उपचारपद्धतीत शस्त्रक्रियेविना मुळव्याध बरा करता येऊ शकतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
 • भारतात जवळपास चार कोटी लोकांना मुळव्याधीचा त्रास
 • दरवर्षी या आजाराचे १० लाख नवीन रूग्ण आढळतात
 • हा आजार चाळीशीनंतर उद्धवणारा आजार होता. मात्र आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री-पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागलायं
 • मुळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत

मुळव्याध रुग्णांवर उपचार करून त्यांना बरं करता यावं याकरता वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयात येत्या १५ मे रोजी शिबीराच आयोजन केलंय. साधारणतः १५ दिवस हे आरोग्य शिबीर आहे. जवळपास ५०० मुळव्याधीच्या रुग्णांना उपचार देऊन बरं करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. गोविंद खट्टी म्हणाले की, “मुळव्याध रुग्णांची संख्या सध्या वाढतेय. वेळेवर उपचार न मिळाल्यानं हा त्रास वाढून असह्य होतो. रुग्णालयात दररोज १० रुग्ण हे मुळव्याधीचे असतात. तर महिन्याला ४० रुग्णांवर आम्ही शस्त्रक्रिया करतो. लवकरच रुग्ण उपचारासाठी आल्यावर शस्त्रक्रियेविना औषधोपचारावर बरं करता येतं. यासाठी वेळीच आजाराचं निदान करून उपचार सुरू व्हावं याकरता मुळव्याध शिबीर भरवण्यात येणारे.”

“सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, झोपेचा अभाव, तंबाखू सेवन, उघड्यावरील मसालेदार आणि तेलकट पदार्थांचं सेवन, रात्रीचं जागरण, ताणतणाव आणि बद्धकोष्ठता यामुळे मुळव्याधीची समस्या मोठ्याप्रमाणात जाणवते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार बरा होऊ शकतो.” असंही डॉ. खट्टी म्हणाले.

मुळव्याधाची लक्षणं

 • शौचादरम्यान वेदना
 • रक्तस्त्राव होणं
 • गुद्दवाराचा बाह्य भाग फुगीर होणं
 • गाठी निर्माण होणं

उपाय

 • आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा
 • कच्च्या पालेभाज्यांचे सेवन करावं
 • फळं खाताना सालीसकट खावीत
 • चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ यांचं सेवन टाळावं
 • पुरेशी झोप घ्या
 • मुळव्याधींच्या रुग्णांनी थोड्या प्रमाणात स्टीम बाथ घ्यावेत, यामुळे रक्तस्त्राव कमी होतो
 • रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तुप टाकून प्यावं
 • १ चमचा मोहोरी आणि दोन चमचे दुध यांची बारीक पेस्ट करून दिवसातून ३-४ वेळा मुळव्याधाच्या मोडावर लावणं.
 • सुरणाची भाजी हे मुळव्याधीवर गुणकारी औषध आहे.
 • ताकाचे सेवन
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter